Tata Power ने देशभरात उभारले 62000 EV चार्जर स्टेशन

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये  इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचा मोठा कल दिसून येत असताना आता देशभरात 62,000 ईव्ही होम चार्जर लावण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग प्रदाता टाटा पावर ने  हे EV होम चार्जर लावले आहेत.  एवढेच नाही तर  येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत टाटा पावर कडून 11,529 नवीन EV Home Charger लावण्यात येतील.

   

काय म्हणाले टाटा पावरचे बिजनेस डेव्हलपमेंट प्रमुख

भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीला गती मिळवून देण्यासाठी 62000 इव्ही होम चार्जरचा टप्पा ओलांडणे हे आमचे वचनबद्धता दर्शवते असं  टाटा पावरचे बिजनेस डेव्हलपमेंट प्रमुख वीरेंद्र गोयल यांनी सांगितलं. आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांच्या घरांच्या सोयीनुसार चार्जिंग आवश्यकता  पूर्ण करण्यासाठी, सुलभ आणि  ग्राहकांना अनुकूल चार्जिंग पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी तयार आहोत. असं देखील ते म्हणाले.

या ठिकाणी उपलब्ध केले EV चार्जर स्टेशन

टाटा पॉवरच्या माध्यमातून, ऑफिस, निवासी कल्याण संघटना, कार डीलरशिप, मॉल, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, महामार्ग  यासारख्या बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पॉईंट  उपलब्ध करण्यात आले आहे. जेणेकरून बाहेर वाहन चार्ज करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सप्टेंबर 2023 च्या  तीमाही मध्ये टाटा पावरने 180 ई बस चार्जिंग पॉइंट तैनात केले. आता या ई बस चार्जिंग पॉइंट ची संख्या 464 झाली आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये टाटा पॉवर ने भारतातील इव्ही चार्जिंग स्टेशन वाढवण्यासाठी जुमकार सोबत पार्टनरशिप केली होती. पार्टनरशिप केल्यानंतर टाटा पावर च्या इव्ही चार्ज पॉइंट्सला जुमकार प्लॅटफॉर्म सोबत जोडण्यात आले. आता 2024 च्या दुसऱ्या तीमाही मध्ये आणखीन चार्जिंग स्टेशन आणि ईव्ही होम चार्जर लावण्याकडे  कंपनीचा कल आहे.