Tata Punch CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी (Tata Punch CNG)। प्रसिद्ध कंपनी Tata Motors ने आपल्या CNG पोर्टफोलिओचा विस्तार करताना, बाजारात TATA punch CNG व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. हे टाटा मोटर्सचे TATA punch हे चौथे सीएनजी मॉडेल आहे. या एसयुव्ही कार ला 5 व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आले असून टाटाच्या या सीएनजी कारची किंमत 7.10 लाखापासून 9.68 लाख रुपयांपर्यंत आहे. आज आपण या कारचे फीचर्स, इंजिन आणि मायलेज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

   

या कार बद्दल टाटा मोटर्स ने एका निवेदनात सांगितले की, पंच आयसीएनजी मध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. यामध्ये इंधन भरताना कार बंद करण्यासाठी मायक्रो स्विच ची सुविधा दिलेली आहे. टाटा टियागो आणि टिगोर मॉडेलमध्ये सुद्धा ट्विन सिलेंडर टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर एका मोठ्या सिलेंडरचा वापर करण्यापेक्षा टाटा मोटर्सने दोन छोटे तीस लिटर सिलेंडर वापरले आहे. त्यामुळे कुल क्षमता ही 60 लिटर एवढी आहे.

Tata Punch CNG 4

इंजिन – (Tata Punch CNG)

TATA punch CNG या कार मध्ये 1.2 लिटर 3 सिलेंडर इंजन वापरले असून हे इंजन पेट्रोल वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन सह हे इंजिन 86 एचपी पॉवर आणि 113 nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी मोड मध्ये 73.4 hp पॉवर आणि 103 nm टॉर्क जनरेट करते. टाटाच्या या CNG कारला 5 स्पीड मॅन्युअल गिअर देण्यात आलेले आहे. म्हणजेच सीएनजी ग्राहकांना या कार मध्ये ऑटोमॅटिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही .

Tata Punch CNG 5

किंमत किती ?

Tata Punch CNG च्या प्रत्येक वेरियंट ची किंमत वेगवेगळी आहे. या कारच्या प्युअर वेरियंट ची किंमत 7,09,900 लाख रुपये एवढी आहे. तर एडवेंचर वेरियंट ची किंमत 7,84,900 एवढी आहे. त्याचबरोबर एडवेंचर रिदम या वेरियंट ची किंमत 8,19,900 असून Accomplished या वेरियंट ची किंमत 884,900 रुपये आणि Accomplished Dazzele या वेरियंट ची किंमत 9,67,900 एवढी आहे.