टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये SUV कारची मोठ्या प्रमाणात चलती आहे. SUV मध्ये देखील फुल साइज SUV मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करत असून यामध्ये Toyota Fortuner ही ग्राहकांच्या तरुणांच्या पसंतीस उतरनारी SUV आहे. Toyota Fortuner ही एसयूव्ही दमदार मायलेज, रोड प्रेझेन्स, परफॉर्मन्स स्पेस, मजबुती या सर्व गोष्टींसाठी आणि पावरफुल फीचर्स साठी ओळखली जाते. परंतु आता टोयोटा फॉर्च्युनरलाही सर्व बाबतीत मागे टाकणारी गाडी बाजारात आली आहे. ही गाडी दुसरी तिसरी कोणती नसून टाटा सफारी आहे. कंपनीने नुकतंच टाटा सफारीचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे.
ही टाटा सफारी 7 Seater SUV असून टाटाने यामध्ये पूर्णपणे चेंजेस केले आहेत. कंपनीने पूर्णपणे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करून टोयोटा फॉर्च्यूनरला मागे टाकले आहे. टाटा सफारीच्या बेस वेरीएंटची एक्स शोरूम किंमत 15.85 लाख रुपये एवढी आहे. आणि टॉप व्हेरीएंट ची एक्स शोरूम किंमत 25.21 लाख एवढी आहे. जाणून घेऊया या एसयूव्ही चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
इंजिन आणि मायलेज –
टाटा सफारी मध्ये 1956 सीसी डिझेल इंजन देण्यात आले आहे. या कारमध्ये चार सिलेंडर देण्यात आले आहे. या कारमध्ये वापरण्यात आलेले इंजिन 167.6 BHP पावर जनरेट करते. या इंजिन सोबत 6 स्पीड ऑटोमॅटिक गियर बॉक्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर एक लिटर मध्ये ही कार 17 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. त्यानुसार फुल साइज एसयूव्ही मध्ये या कारचे मायलेज बेस्ट कॅटेगिरी काउंट मध्ये येते. या कारमध्ये 73 लिटर बुट स्पेस देण्यात आला आहे.
टाटा सफारी या SUV मध्ये पैनारामिक सनरूफ, बिग इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, इलेक्ट्रिकली ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, रियर एसी वेंट्स, क्लायमेट कंट्रोल एसी, एबीएस, ईबिडी, रिव्हर्स पार्किंग सेंसर, 360 डिग्री कॅमेरा यासारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहे. एवढेच नाही तर टाटा ने या कारमध्ये बरेच बदल केले आहेत. या कारमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प देखील देण्यात आले आहे.