Tata Sumo EV : Tata Sumo येणार Electric अवतारात; बाजारात घालणार धुमाकूळ

Tata Sumo EV : भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनींपैकी एक असलेली Tata Motors मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहन लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने Nexon , Safari , Harrier यासारख्या बऱ्याच कॉम्पॅक्ट SUV इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च केले आहेत. आता कंपनी आणखीन एक कार इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लॉन्च करणार आहे. तुम्हाला टाटा मोटर्सची सुमो ही कार आठवत असेल. Tata Sumo या जुन्या मॉडेलचे प्रोडक्शन कंपनीने 2019 मध्येच बंद केले होते. परंतु आता कंपनी  ही टाटा सुमो  इलेक्ट्रिक अवतारामध्ये (Tata Sumo EV) लॉन्च करण्याच्या तयारी मध्ये आहे. सध्या सोशल मीडियावर टाटा सुमो इलेक्ट्रिक रेंडर चे फोटोज मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

   

लूक- Tata Sumo EV

Tata Sumo EV RENDER ही अपकमिंग कार थ्री रो सिटींग कॉन्फिगरेशन सोबतच आकर्षक डिझाईन मध्ये लॉन्च करण्यात येऊ शकते. ही कार  ICE मॉडेल पेक्षा जास्त प्रीमियम लूक मध्ये येईल. यासोबतच क्रॉसओव्हर लुक देखील या कारला मिळू शकतो. या कार मध्ये कंपनीकडून डे टाईम रनिंग लाइट्स DRL यासोबतच ऑल LED लाइटिंग सेटअप मिळू शकते. या अपकमिंग कार च्या फ्रंट मध्ये ब्लॅक ग्रील आणि क्रोम लोगो मिळेल. आणि बॅगमध्ये स्पोर्टी टेललॅम्प मिळू शकतो.

फिचर्स

Tata Sumo EV RENDER मध्ये डस्ट प्रोटेक्शन, अधिक सेफ्टी आणि ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टीम ADAS टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येऊ शकतो. यासोबतच अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सेंट्रल कन्सोल आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे फीचर्स मिळतील. या अपकमिंग कार मध्ये टाटा सफारी फेसलिफ्ट प्रमाणे बरेच फीचर्स मिळू शकतात. या कारच्या इंटरियर मध्ये कम्फर्टेबल केबिन देण्यात येईल. यामध्ये ड्रायव्हर सीट 360 डिग्री वर मुव्ह होऊ शकते. यासोबतच केबिनमध्ये नवीन डिझाईन डॅशबोर्ड दिसेल. 

मायलेज

Tata Sumo EV RENDER मध्ये हॅरियर इलेक्ट्रिक पॉवरट्रेन मिळेल. याशिवाय इलेक्ट्रिक मोटर आणि पावरफुल बॅटरी देखील देण्यात येईल. ही बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर कार 400 ते 500 किलोमीटर एवढे मायलेज देईल. ही कार लॉन्च झाल्यानंतर 20 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध होऊ शकते. सध्या तरी कंपनीने या अपकमिंग कार च्या किमती बद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.