टाइम्स मराठी । सध्या भारतीय कार बाजारात टाटा टियागो (Tata Tiago) कार सर्वात स्वस्त ठरली आहे. ग्राहकांकडून देखील टाटा टियागोची मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसत आहे. आता बाजारात टाटा टियागोची मारुती स्विफ्ट शी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कारला बाजारात सर्वात जास्त पसंती मिळत आहे. स्वस्त आणि मस्त कार म्हणून मारुती स्विफ्टकडे पाहिले जात आहे. स्विफ्ट जून महिन्यात सर्वात जास्त विक्री झालेली कार ठरली आहे.
मारुती सुझुकी स्विफ्टने व्हॉल्यूमबाबतीत टाटा टियागोला मागे टाकले आहे. परंतु बाजारात सर्वात जास्त विकली जाणारी कार टाटा टियागो ठरली आहे. यामुळे जूनच्या महिन्यात स्विफ्टची विक्री २ टक्क्यांनी कमी झालेली पाहिला मिळाली आहे. याचबरोबरीने वार्षिक आधारावर टियागो (Tata Tiago) ची विक्री ५३ टक्क्यांनी वाढली आहे. याचा चांगला फायदा टाटा कंपनीला झाला आहे.
जून २०२३ स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)च्या एकूण १५,९५५ युनिट्सची विक्री झाली होती. जी जून २०२२ च्या १६,२१३ युनिट्सपेक्षा सुमारे २ टक्के कमी होती. याचा चांगलाच तोटा कंपनीला बसला. तर दुसऱ्या बाजूला टाटा टियागोने जून २०२३ मध्ये ८,१३५ युनिट्सची विक्री केली. जी जून २०२२ च्या ५,३१० युनिट्सपेक्षा ५३ टक्के जास्त आहे. टाटाने गेल्या दोन महिन्यात भारतीय बाजारपेठेत एकूण ४७,२३५ वाहनांची विक्री केली होती. परंतु व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत कंपनीचे नुकसान झालेले देखील पाहिला मिळाले.
गेल्या महिन्यात कंपनीने ३४,३१३ व्यावसायिक वाहनांची विक्री केली जी जून २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ३७,२३५ युनिट्सपेक्षा कमी होती. परंतु आता टाटा टियागो (Tata Tiago) जून २०२३ मध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. भारतीय कार बाजारात टाटा टियागो १७ व्या क्रमांकावर आहे. टियागोची किंमत ५.६० लाख ते ८.११ लाख रूपये आहे. या कारला २४२ लीटरची बूट स्पेस मिळते. ही कार १.२-लिटर पेट्रोल इंजिन असून ते ८६PS पॉवर आणि ११३Nm पीक टॉर्क जनरेट करते. Tiago मध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या महागाईच्या जमान्यात अनेकजण ही कार घेत आहे.