Tata Tiago Ev चा बाजारात धुमाकूळ, खास करून महिलांची मोठी पसंती; फीचर्स अन् किंमत पहा

Tata Tiago Ev । भारतीय बाजारपेठेत टाटा कंपनीच्या गाड्यांना नेहमीच चांगली मागणी असते. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीना वैतागून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांची ही वाढती मागणी पाहून टाटानेही आपल्या 2 गाड्या टाटा नेक्सॉन आणि टाटा टियागो बाजारात आणल्या. त्यातील टाटा नेक्सॉन इव्हीच्या दमदार यशानंतर आता टाटा टियागो इव्हीला (Tata Tiago Ev) सुद्धा ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. खास करून देशभरातील महिलांनी टाटा टियागो इव्हीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे.

   

आतापर्यंत 24% महिलांनी खरेदी केली Tata Tiago Ev –

Tata Tiago Ev ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मानली जाते. त्यामुळे या गाडीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच टाटाच्या टियागो इव्ही ने 15000 विक्रीचा आकडा ओलांडला आहे. या इलेक्ट्रिक कारला छोट्या छोट्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजून एक महत्त्वाची आणि खास गोष्ट म्हणजे महिलांकडून या कारला मोठी पसंती मिळत आहे. आतापर्यंत 24% महिलांनी ही कार खरेदी केली. याचबरोबर Tata Tiago Ev चे 56% ग्राहक हे 40 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. टाटा टियागो ईव्ही ही कार पहिल्यांदा पाहताच ग्राहकांना आकर्षित करतेय.

Tata Tiago Ev मध्ये काय खास आहे? –

टाटा टियागो ईव्हीला 19.2 kWh आणि 24 kWh असे 2 बॅटरी ऑप्शन देण्यात आले आहेत. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार 250 ते 300 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. या कारला सिटी आणि स्पोर्ट असे दोन ड्राइव्ह मोड मिळतात. Tata Tiago Ev ही z- connect यासोबतच टेलीमॅट्रिक्स कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असून रिमोट एसी ऑन ऑफ, रिमोट जिओ फेन्सिंग, रियल टाईम चार्जिंग स्टेटस, स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी यासोबतच 65 पेक्षा जास्त फीचर्स यामध्ये दिलेले आहेत. Tata Tiago Ev ची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने आपली ही इलेक्ट्रिक कार 5 रंगांच्या पर्यायात आणली आहे.