टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Tata Motors ने 2022 मध्ये Tata Tiago EV ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. ही इलेक्ट्रिक व्हर्जन कार चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून यामध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही देखील यंदा फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून दिवाळीला तुमच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे कार खरेदी करू शकत नसाल तर 8.69 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असलेलीं Tata Tiago EV तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. आज आपण जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
स्पेसिफिकेशन
Tata Tiago EV या कारमध्ये दोन बॅटरी पॅक उपलब्ध करण्यात आले आहे. यातील एक बॅटरी 19.2 kwh ची आहे तर दुसरी बॅटरी 24 kwh क्षमतेची आहे. या दोन्ही बॅटरी चार्ज होण्यासाठी अनुक्रमे 6.9 तास आणि 8.7 तासांचा कालावधी लागतो. यातील 19.2 kwh ची बॅटरी 250 किलोमीटर रेंज देते तर 24 kwh क्षमतेच्या बॅटरीच्या माध्यमातून तुम्ही 315 किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करू शकता. Tata ची ही इलेक्ट्रिक कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम आहे.
फिचर्स– Tata Tiago EV
Tata Tiago EV या इलेक्ट्रिक कार मध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, क्रूज कंट्रोल, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, रियर व्ह्यू कॅमेरा, 4 स्पीकर, ऑटो एसी, रेन सेंसिंग वायपर यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच सात इंच चा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील यात उपलब्ध आहे.
240 लिटरचा बूट स्पेस
Tata Tiago EV या लक्झरी कार मध्ये अँटी ब्रेकिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. यामुळे कारच्या चारही चाकांना सेन्सर कंट्रोल करण्यास मदत करते. या न्यू जनरेशन कार मध्ये 5 मोनो टोन कलर्स उपलब्ध आहे. एवढेच नाही तर यामध्ये 240 लिटरचा बूट स्पेस देखील उपलब्ध आहे. जेणेकरून ट्रॅव्हलिंग करत असताना जास्त स्पेस मिळतो.