कमी किंमतीत सेफ्टी कारच्या शोधात आहात? Tata Tiago तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

टाइम्स मराठी | आजच्या काळात कार ही लोकांची दैनंदिन गरज बनली आहे. काही नसले तरी चालेल पण एक घराबाहेर कार असावी असे सर्वांना वाटते. मात्र याच कारमुळे अपघात होण्याची ही शक्यता तितकीच वाढली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित कार निवडणे खूप कठीण झाले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका कारची माहिती देणार आहोत जी सुरक्षितेच्याबाबतीत नंबर वन आहे. तसेच परवडणारी आहे. भारतातील अनेक कार उत्पादकांनी टियागो कारला 5 स्टार रेटिंग दिले आहे. (Tiago) टियागोचे नवीन फीचर्स आणि मॉडेल बघून अनेकांनी या कारसाठी पसंती दाखवली आहे.

   

भारतातील कार बाजारात दररोज नवनवीन गाड्या येत असतात. यातील कित्येक गाड्या या महागड्या आणि फक्त शोसाठी देखील असतात. मात्र या सगळ्यात टियागो कार सगळ्याच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही जर स्वस्त आणि सुरक्षित कार घेण्याचा विचार करत असाल तर टियागो कार तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकते. टियागो कार तुम्हाला परवडणारी आणि सुरक्षा देणारी सर्वात उत्तम कार आहे.

मायलेज किती?

टाटा टियागो हे स्वदेशी ऑटोमेकरचे सर्वात विशिष्ट अशा उत्पादनांपैकी एक आहे. टियागो कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यात अनेक पॉवरट्रेन पर्याय आहेत. ही भारतातील सर्वात सुरक्षित कारांपैकी एक आहे. या कारला ग्लोबल NCAP कडून 4 स्टार मिळाले आहेत. टाटा टियागोमध्ये देण्यात आलेले फीचर्स आणि कारचे स्ट्रक्चर लोकांना याकडे आकर्षित करत आहे. या कारच्या खरेदीसाठी ऑनलाइन बुकिंग ही सुरू आहे. टियागो कारमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे, याचे पेट्रोल इंजिन 1199 cc चे आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. टियागो कार मायलेज 19.0 kmpl ते 26.49 km/kg या प्रकारानुसार आणि इंधनवर अवलंबून आहे. टियागो 5 सीटर असून त्याची लांबी 3765 मिमी, रुंदी 1677 मिमी आणि व्हीलबेस 2400 मिमी आहे.

किंमत

टाटा टियागो कार 10 लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. टाटा टियागो ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. ही कार जर तुम्ही कंपनीच्या ऑफर्स मध्ये खरेदी केले तर तुम्हाला ती 5 लाखांपर्यंत मिळून जाईल. टाटा टियागो बेस मॉडेलची किंमत 5.60 लाख रुपयांच्या पुढे आणि टॉप मॉडेलची किंमत 8.15 लाख रुपये अशी आहे. परंतु या कारला मिळणारी पसंती बघता कंपनी कारची किंमत कमी करण्याच्या विचारात आहे. अशा अनेक कारणांमुळे टियागो दर्जेदार आणि परवडणारी कार ठरत आहे.