TCL ने लाँच केले 2 Smart TV; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये टेक कंपनी TCL ने नवीन दोन Smart TV लॉन्च केले आहे. हे लॉन्च केलेले दोन्ही स्मार्ट टीव्ही अप्रतिम साईज मध्ये उपलब्ध करण्यात आले असून यामध्ये अप्रतिम डिस्प्ले टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. या दोन्ही नवीन Smart TV चे नाव TCL C755 आणि TCL P745 असे आहे. या नवीन Smart TV चे डिस्प्ले पॅनल गेमिंगला देखील सपोर्ट करतात. त्यामुळे या Smart TV मध्ये गेमिंगचा अनुभव येतो. आज आपण जाणून घेऊया या दोन्ही स्मार्ट टीव्हीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

   

TCL C755 या Smart TV मध्ये कंपनीने 50 इंच ते 98 इंच ची स्क्रीन साईज उपलब्ध केली आहे. या स्मार्ट टीव्ही चा डिस्प्ले 4k UHD रिझोल्युशन आणि 144 hz रिफ्रेश रेट सह येतो. तुम्हाला या टीव्ही मध्ये डिस्प्ले लेंटेन्सी गॉज DLG सह स्मूद व्हिज्युअल देखील उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये 550 नीट्स ब्राईटनेस प्रदान करण्यात आला असून 6000:1 कॉन्ट्रास्ट रेशो देखील उपलब्ध करण्यात येत आहे.

TCL C755 या स्मार्ट टीव्ही मध्ये कंपनीने डॉल्बी व्हिजन आयक्यू HLG, HDR 10+ सपोर्ट मिळतोय. हा स्मार्ट टीव्ही गुगल टीव्ही सॉफ्टवेअर वर काम करतो. या स्मार्ट टीव्ही मध्ये AMD FreeSync प्रीमियम प्रो आणि IMAX इनहॅन्ड यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. तुम्ही हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या स्किन साईज मध्ये खरेदी करू शकतात. या स्मार्ट टीव्ही ची किंमत 89,990 रुपयांपासून 4,99,990 रुपयांपर्यंत आहे.

दुसरीकडे, TCL P745 ही कंपनीची बजेट फ्रेंडली टीव्ही असून यामध्ये कंपनीने वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये 144 hz रिफ्रेश रेट सह 43 इंच ते 83 इंचापर्यंत स्क्रीन साइज मिळतेय या स्मार्ट टीव्ही सोबत कंपनीने व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि DLG उपलब्ध केले आहे. DLG म्हणजे डिस्प्ले लेंटेन्सी गॉज.  यासह स्मूद व्हिज्युअल देखील कंपनी ने उपलब्ध केले आहे. TCL P745 मध्ये AMD FreeSync प्रीमियम प्रो आणि IMAX इनहॅन्ड यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच VESA वॉल माउंटिंग सपोर्ट देखील या स्मार्ट टीव्ही मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 85 इंच च्या स्मार्टटीव्ही ची किंमत वेबसाईटवर 1,90,499 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.