TCL ने लाँच केले 2 Smart TV ; घरबसल्या येईल थेटरमध्ये बसल्याचा फील

टाइम्स मराठी । यावर्षी ऑगस्ट महिन्यात TCL या कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये टीव्ही सिरीजचे नवीन मॉडेल लॉन्च केले होते. आता कंपनीने भारतात आणखीन दोन नवीन Smart TV सिरीज लॉन्च केली आहे. C755 QD MINI LED 4K TV आणि P745 4K UHD असे या दोन्ही स्मार्ट टीव्हीचे नाव असून यामध्ये कंपनीने अप्रतिम फीचर्स उपलब्ध केले आहे. सध्या दिवाळी हा सण तोंडावर आला असून या फेस्टिवलमध्ये तुम्ही हे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. आज आपण या दोन्ही टीव्हीचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

   

TCL P745 4K UHD आणि C755 QD MINI LED 4K TV स्पेसिफिकेशन 

TCL कंपनीच्या P745 4K UHD या स्मार्ट टीव्ही मध्ये  4K UHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3840 × 2160 पिक्सेल रिझोल्युशन  आणि 144 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्ट टीव्ही मध्ये मेटलिक बेसन लेस डिझाईन मिळते. स्मार्ट टीव्हीच्या VA पॅनलसह फ्लॅश LCD स्क्रीन देखील देण्यात आली आहे. ही स्क्रीन 550 निट्स पीक ब्राईटनेस आणि 16:9 अस्पेक्ट रेशो ऑफर करते. यासोबतच या स्मार्ट टीव्हीचा कॉन्ट्रास्ट  रेशो 6000:1 आहे. C755 QD MINI LED 4K TV या स्मार्ट टीव्ही मध्ये  मिनी LED टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्ट टीव्ही सिरीज मध्ये  50 इंच, 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 85 इंच आणि 98 इंच स्क्रीन असलेले स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आहे.

P745 4K UHD आणि C755 QD MINI LED 4K TV  फिचर्स

P745 4K UHD आणि C755 QD MINI LED 4K TV या स्मार्ट टीव्ही मध्ये  game master 2.0, Mira Cast, video chat and Quick setting, AMD freeSync, premium pro, VESA Wall mounting हे फीचर्स देखील उपलब्ध आहे. यासोबतच या स्मार्ट टीव्ही मध्ये  गुगल असिस्टंट इनबील्ड देण्यात आले आहे. यासोबतच ब्लूटूथ, वाय-फाय, HDMI कनेक्टिव्हिटी हे कनेक्टिव्हिटी फीचर्सचा लाभ तुम्ही घेऊ शकता. P745 4K UHD  या स्मार्ट टीव्ही मध्ये  HDR10 सपोर्ट उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये  AiPQ प्रोसेसर देण्यात आले आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये डॉल्बी व्हिजन  IQ, HLG हाय डायनामीक रेंज फॉरमॅट यासारखे फीचर्स उपलब्ध आहे.

P745 4K UHD आणि C755 QD MINI LED 4K TV किंमत

P745 4K UHD आणि C755 QD MINI LED 4K TV या दोन्ही स्मार्ट टीव्ही मॉडेलच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर P745 4K UHD या स्मार्ट टीव्ही मॉडेलच्या 98 इंच स्क्रिन असलेल्या स्मार्ट टीव्ही ची किंमत 3,09,990 रुपये आहे. तर C755 QD MINI LED 4K TV या सिरीज ची किंमत 89,990 रुपयांपासून तर 4 लाख 99 हजार 990 एवढी आहे.