Apple Inc तयार करणारी जपानी कंपनी येणार भारतात, 10,000 रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार

टाइम्स मराठी । टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत जागतिक हब मानली जाणारी जपानची सर्वात मोठी कंपनी आता भारतात येणार आहे. यामुळे आता चीनला मोठा धक्का बसला असेल. चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्या चीन मधून बाहेर पडत असून भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. आता जपानी कंपनीने देखील भारतीय बाजारपेठेमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जपान मधील सर्वात मोठया कंपन्यांपैकी एक असलेली TDK कॉर्पोरेशन कंपनी भारतात येणार आहे. ही कंपनी Apple lnc ची जागतिक लिथियम आयन बॅटरी चा पुरवठा करते. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर Apple च्या Iphone साठी बॅटरी सेल डेव्हलप करेल. यासोबतच ॲपलच्या लिथियम आयन बॅटरी साठी सेल असेंबलर सणवोडा इलेक्ट्रॉनिक्सला पुरवठा करेल. सनवोडा हे जगभरातील वेगवेगळ्या बाजारपेठेमधून बॅटरी आयात करते. आणि ही कंपनी देशातील एकमेव लिथियम आयन बॅटरी सेल पुरवठा करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

   

हरियाणा येथे उभारणार प्लांट

TDK कार्पोरेशन ही जपानी कंपनी भारतातील लिथियम आयन बॅटरी सेल डेव्हलप करण्यासाठी हरियाणातील मानेसर येथे प्लांट उभारेल. यासाठी कंपनीने 180 एकर जमीन खरेदी केली आहे. Apple कंपनीला पुरवठा करण्यासाठी ही कंपनी लवकरच बॅटरी सेलचे प्रोडक्शन सुरू करेल. ही जापानी कंपनी भारतात आल्यानंतर देशात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील. यामुळे आयटी व्यवसायिकांना देखील फायदा होऊ शकतो.

भारतात मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PLI योजना आणखीन यश आल्याचं आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं. त्यांनी ट्विटरवर बिजनेस स्टॅंडर्ड चा अहवाल शेअर करत पोस्ट केली. यावेळी ते म्हणाले की, यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल. Apple साठी सेलचा सर्वात मोठा पुरवठा करणारी कंपनी TDK हरियाना येथील मानेसर या ठिकाणी युनिट स्थापन करेल. आणि याच ठिकाणी बॅटरी सेल तयार केले जातील. यामुळे भारतात 8000 ते 10,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे देखील ते म्हणाले.