Tecno ने लाँच केला दमदार Mobile; 64 MP कॅमेरा, किंमतही कमी

टाइम्स मराठी । आजकाल फाईव्ह जी स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. सर्वच मोबाईल कंपन्या बाजारात वेगवेगळे मोबाईल लाँच करत असून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर टेक्नो कंपनीने भारतामध्ये नवीन स्मार्टफोन वेरियंट लॉन्च केला आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी ह्या कंपनीने Tecno Camon 20 pro 5G आणि Camon 20 premier 5G हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते. या व्हर्जनला अधिकृतपणे Tecno Camon 20 Avocado Art Edition म्हटले जात आहे.

   

Tecno Camon 20 Avocado Art Edition मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन 12nm MediaTek Helio G85 SoC द्वारे समर्थित आहे. मोबाईलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि QVGA तिसरा कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये ८ GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज उपलब्ध आहे. टेक्नोच्या या मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या कनेक्टिव्हिटीबाबत सांगायचं झालयास यामध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth 5, GPS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. यात बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी एक्सीलरोमीटर, ई-कंपास, सभोवतालचा प्रकाश सेन्सर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

कलर ऑप्शन

टेक्नो कंपनीचा हा नवा स्मार्टफोन सेरेनिटी ब्ल्यू कलर ऑप्शनसह फॉक्स लेदर बॅक मध्ये उपलब्ध आहे. या फर्स्ट लेदर बॅगचा रंग हिरवा असून या Avocados मध्ये वेगळ्या प्रकारचे टेक्सचर देण्यात आले आहे. टेक्नो कंपनीच्या Tecno Camon 20 हा स्मार्टफोन प्रीडाऊन ब्लॅक आणि सेरेनिटी ब्लू या दोन ऑप्शन्स मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. पहिल्या वेरियंटमध्ये प्लास्टिक आणि दुसऱ्या वेरियंट मध्ये फॉक्स लेदर रियर पॅनल देण्यात आले होते.

किंमत आणि उपलब्धता

Tecno Camon Avocado Art Edition हा स्मार्टफोन सर्वात बेस्ट दिसणारा आणि बेस्ट डिझाईन असलेल्या स्मार्टफोन पैकी एक आहे. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये एवढी असून सध्या हा स्मार्टफोन amazon, flipcart वर उपलब्ध करण्यात आलेला नाही. हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असेल तर ऑफलाइन पद्धतीने रिटेल स्टोअर्स वर तुम्ही खरेदी करू शकतात.