Tecno Megabook T1 लॅपटॉप लाँच; वजनाने हलका आणि अतिशय स्लिम

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये आजकाल कमी वजनाचे आणि स्लिम लॅपटॉप मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरत आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या वजनाला हलकाफुलका आणि स्लिम बनवण्यासाठी प्रयत्न करत असून याच पार्श्वभूमीवर टेक्नो कंपनीने भारतामध्ये नवीन एडिशन Tecno Megabook T1 लॅपटॉप लॉन्च केला आहे. टेक्नो कंपनीने लॉन्च केलेला हा अवघ्या 1.56 किलोग्रॅम वजनाचा आहे. आज आपण या लॅपटॉपचे फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

Tecno Megabook T1 या लॅपटॉप मध्ये 15.6 इंच चा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 350 नीट्स ब्राईटनेस देतो. हा डिस्प्ले पूर्णपणे एचडी असल्यामुळे समोरासमोर दृश्य बघितल्यासारखा अनुभव आपल्याला मिळतो. त्यामुळे वर्क आणि मनोरंजन दोन्ही गोष्टी ग्राहकांना मिळतात. या लॅपटॉप मध्ये इंटेलच्या अत्याधुनिक 11 व्या पिढीचे प्रोसेसर वापरण्यात आले आहे. हे प्रोसेसर जलद पद्धतीने काम करते. जर तुम्ही लॅपटॉपवर मल्टी टास्किंग काम करत असाल आणि संसाधन केंद्रित एप्लीकेशन्स वापरत असाल तर त्यासाठी मेगाबुक टी1 तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते.

बॅटरी आणि स्टोरेज– Tecno Megabook T1

Tecno Megabook T1 यमध्ये मजबूत 70 whr बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्ट च्या माध्यमातून 65 W PD अल्ट्रा फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 17 तास चालते. म्हणजेच काम करत असताना हा लॅपटॉप कंटिन्यू चार्ज करण्याची गरज नाही. टेक्नो मेगाबुक टी1 लॅपटॉप मध्ये 16 जीबी रॅम आणि एक टीबी एसएसडी स्टोरेज उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट, फाईल निवांत लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. कंपनीने टेक्नो मेगाबुक टी1 ला VC कूलिंग सिस्टीम ने सुसज्ज केले असून त्यामुळे तुमचा लॅपटॉप गरम सुद्धा होत नाही.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Tecno Megabook T1 लॅपटॉपमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.0, ड्युअल यूएसबी 3.0 पोर्ट, यूएसबी 3.1 टाईप सी, एचडीएमआय 1.4, यूएसबी 3.1, टाइप ए, एसडी कार्ड स्लॉट, 3.5 मिनी ऑडिओ जॅक हे कनेक्टिव्हिटी फीचर्स या लॅपटॉप मध्ये उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे टेक्नो मेगाबुक टी1 या लॅपटॉप मध्ये विंडोज 11 होम आणि एमएस ऑफिस कंपनी अगोदरच इन्स्टॉल करून देते. म्हणजेच तुम्हाला विंडोज 11 होम आणि एमएस ऑफिस इन्स्टॉल करण्याची गरज नाही. हा लॅपटॉप प्रभावशाली डिस्प्ले, स्टोरेज, लॉंग बॅटरी लाईफ, कनेक्टिव्हिटी यासारख्या बऱ्याच फीचर्सने परिपूर्ण आहे.

किंमत

Tecno Megabook T1 या लॅपटॉप ची किंमत core i3 कॉन्फिगरेशननुसार सुरू होते. यामध्ये core i5 ची किंमत 47 हजार 999 रुपये एवढी आहे. आणि core i7 ची किंमत 57 हजार 999 रुपये एवढी आहे. याशिवाय core i3 ची किंमत 37 हजार 999 रुपये एवढी आहे. हा लॅपटॉप डेनिम ब्ल्यू, स्पेस ग्रे आणि मून शाईन सिल्वर या ३ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.