लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार Tecno चा फ्लिप स्मार्टफोन; मिळणार हे खास फीचर्स

टाइम्स मराठी | काही दिवसांपूर्वी चिनी कंपनी टेक्नोने भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या किंमतीत फोल्डेबल फोन लॉन्च केला होता. आता टेक्नो कंपनी भारतात फ्लिप फोन लवकरच लॉन्च करणार आहे. नुकताच टेक्नो कंपनीने अपकमिंग फ्लिप फोनचे काही फोटोज ॲमेझॉन वर टिज करण्यात आले. त्यानुसार हा फोन ऑक्टोंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपकमिंग स्मार्टफोनचं नाव Tecno Phantom V Flip 5G असं आहे. चला तर मग या मोबाईल मध्ये काय खास फीचर्स देण्यात आली आहेत ते जाणून घेऊया.

   

स्पेसिफिकेशन

मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन कंपनी 22 सप्टेंबरला सिंगापूर मध्ये लॉन्च करू शकते. त्यानंतर भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. त्यानुसार Tecno Phantom V Flip 5G या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच FHD + AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 144 hz रिफ्रेश सोबत येतो. तसेच मोबाइलमध्ये 1.32 इंच कव्हर डिस्प्ले देखील देण्यात येऊ शकतो.

कॅमेरा

Tecno Phantom V Flip 5G या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सल अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4000 mAh बॅटरी कंपनीकडून देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 66 W चार्जिंगला सपोर्ट करेल.

ऑपरेटिंग सिस्टीम

Tecno Phantom V Flip 5G हा स्मार्टफोन ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेन्शन 1300 Soc वर बेस्ड असू शकतो. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन माली – G77 जिपीयू आणि अँड्रॉइड 13 यासह उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनची साईज 72.35 MM × 7.05 mm एवढी आहे. आणि हा स्मार्टफोन फोल्ड झाल्यानंतर थिकनेस 15.1 mm इतका येईल.

कनेक्टिव्हिटी

Tecno Phantom V Flip 5G या स्मार्टफोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाईप सी पोर्ट यासारखे बरेच कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध करण्यात येऊ शकतात. नुकताच कंपनीने क्लेमशेल फोल्डेबलचे डिझाईन टिज केले असून यापूर्वी हा स्मार्टफोन गुगल प्लेच्या कन्सोलवर देखील दिसला होता.