Tecno Pop 8 : Tecno ने लाँच केला बजेट मध्ये परवडणारा मोबाईल; पहा फीचर्स

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेक्नोने बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Tecno Pop 8 असे या मोबाईलचे नाव असून हा नवीन स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. एप्लेंगो गोल्ड, ग्रेव्हीटी ब्लॅक, मिस्ट्री व्हाईट, मॅजिक स्किन या रंगाचा समावेश आहे. कंपनीने या मोबाईलच्या किमतीचा अजून खुलासा केलेला नाही. आज आपण Tecno Pop 8चे खास फीचर्स जाणून घेऊया

   

स्पेसिफिकेशन

Tecno Pop 8 मध्ये 90 hz रिफ्रेश रेट 6.6 इंच  HD ± LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 × 1612 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. या मोबाईलमध्ये कंपनीने uniSoc T606 SoC चीफसेट बसवली आहे. पॉवर साठी यामध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध असून ही बॅटरी 10 W चार्जिंगला सपोर्ट करते. एवढेच नाही तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड टी-गो एडिशन वर काम करतो.

कॅमेरा सेटअप- Tecno Pop 8

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हा कॅमेरा ड्युअल फ्लॅश सह AI सपोर्टेड आहे. त्यानुसार यामध्ये 13 MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. यासोबतच प्रायव्हसीसाठी या स्मार्टफोनमध्ये साईड माउंट एड फिंगर सेंसर, DTS सपोर्ट सह स्टीरियो ड्युअल स्पीकर यामध्ये उपलब्ध आहे.

स्टोरेज किती?

या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम देण्यात आली आहे. ही रॅम 8 GB पर्यंत एक्सटेंड करण्यात येते. यासोबतच 128 GB इंटरनल स्टोरेज यामध्ये उपलब्ध आहे. हे इंटरनल स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन MINIMALIST स्क्वेअर शेप मध्ये उपलब्ध आहे.