Tecno ने लाँच केला Spark 10 Pro मुन एडिशन; किंमत खिशाला परवडणारी

टाइम्स मराठी । भारताचे चांद्रयान ३ हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळत होते. हा आनंद आणि उत्साह बऱ्याच कंपन्यांनी काही ऑफर देऊन कमी किमतीत प्रोडक्ट विक्री करून सेलिब्रेट केला होता. यासोबतच ऑटोमोबाईल कंपनीने मिशन सक्सेसफुल झाल्याच्या निमित्ताने नवीन मून एडिशन बाईक लॉन्च केली होती. आता चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नो ने Spark 10 Pro Moon Edition स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लॉन्च करण्यात आलेला हा स्मार्टफोन मार्च महिन्यामध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Techno Spark 10 pro चे स्पेशल व्हर्जन आहे. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांमध्ये करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन पुढच्या आठवड्यामध्ये विक्रीसाठी सुरू होणार असून सध्या प्री ऑर्डर साठी ओपन करण्यात आला आहे.

   

6.78 इंच डिस्प्ले –

Techno Spark 10 pro या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच फुल एचडी प्लस डॉट इन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट सह येतोय. एवढेच नाही तर 270 hz टच सॅम्पलिंग रेट आणि 580 नीटस पीक ब्राईटनेससह हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हीलियो G88 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबतच या मोबाईल मध्ये 5000 mAh ची दमदार बॅटरी असून ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टेक्नोचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड ios 12.6 OS वर चालतो.

कॅमेरा –

Techno Spark 10 pro या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्लॅश सह 50 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 32 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर यात 16GB RAM म्हणजेच 8 GB RAM आणि 8GB वर्चुअल रॅम उपलब्ध असून 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. एवढेच नाही तर मायक्रो एसडी कार्ड च्या माध्यमातून हे स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या स्टोरेज फीचर्समुळे स्टोरेज फुल होण्याचा प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच जणांना मोबाईल स्टोरेज फुल्ल झाल्यामुळे प्रॉब्लेम येत असतात. अचानक स्मार्ट फोन हँग पडतो, स्लो चालतो अशा कारणांनी आपण त्रस्त असतो. पण आता बाजारात टेक्नोच्या रूपात असा मोबाईल फोन आला आहे, ज्यामुळे आपल्याला मोबाईल स्लो झाला, स्टोरेज फुल्ल झाले यासारखे प्रॉब्लेम येणार नाही.

Techno Spark 10 pro या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यात 4G सपोर्ट, वाय फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आलेले आहे.