Tecno Spark 20 : फक्त 10,499 रुपयांत मिळतोय 8GB रॅम वाला मोबाईल

Tecno Spark 20 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Tecno नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त मोबाईल आणत असते. इतकं कंपन्यांच्या तुलनेत Tecno च्या मोबाईलच्या किमती किती तरी पटीने कमी असतात. त्यामुळे खास करून मध्यमवर्गीय ग्राहकांचे मोबाईलचे स्वप्नही पूर्ण होते. आताही Tecno ने ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. Tecno Spark 20 असे या मोबाईलचे नाव असून य 8GB रॅम वाला हा मोबाईल तुम्ही अवघ्या 10,499 रुपयांत खरेदी करू शकता. किंमत कमी असली तरी यामध्ये फीचर्स मात्र जास्तच मिळत आहेत.

   

6.6-इंचाचा डिस्प्ले –

Tecno Spark 20 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह 6.6-इंचाचा HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये प्लॅस्टिक युनिबॉडी डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Helio G85 चिपसेट वापरली असून Tecno चा हा स्मार्टफोन Android 13 आधारित HiOS वर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज मिळतंय.

कॅमेरा – Tecno Spark 20

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, Tecno Spark 20 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा मिळतोय आणि समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पाठीमागील पॅनलवर ड्युअल एलईडी फ्लॅश लाईट सिस्टीम सुद्धा देण्यात आली आहे. पॉवर साठी कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. महत्वाची बाब म्हणजे टेक्नोच्या या स्मार्टफोन सह OTT Play प्लॅटफॉर्मवर ऍक्सेस मिळेल. या प्लॅटफॉर्ममध्ये, तुम्हाला Fancode, Shemaroo, SonyLIV, Zee5, सारख्या 23 OTT ॲप्सचा समावेश आहे.

किंमत किती?

Tecno Spark 20 ची किंमत 10,499 रुपये आहे. २ फेब्रुवारीपासून Amazon India आणि निवडक रिटेल स्टोअरवरून या मोबाईलची विक्री सुरू झाली आहे. हा हँडसेट नियॉन गोल्ड, ग्रॅविटी ब्लॅक, सायबर व्हाईट आणि मॅजिक स्किन 2.0 (ब्लू) या चार कलर व्हेरियंटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.