Tecno कंपनी लॉन्च केला Spark 20C मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत Tecno कंपनीचे बरेच मोबाईल उपलब्ध आहेत. आताही Tecno कंपनीने स्पार्क सिरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Tecno Spark 20C आहे. कंपनीने हा मोबाईल ग्लोबल वेबसाईटवर लिस्ट केला असून हा स्मार्टफोन अँटी लेवल कंजूमर साठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या किमतीचा अजून खुलासा करण्यात आलेला नसून हा मोबाईल ग्रॅव्हिटी ब्लॅक, मिस्टरी व्हाईट, अल्पेन ग्लो गोल्ड, मॅजिक स्कीन ( लेदरबॅक )कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.

   

स्पेसिफिकेशन

Tecno Spark 20C या मोबाईल मध्ये 6.6 इंच  hd+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 × 1612 पिक्सल रिझोल्युशन  आणि 90  hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ऑक्टाकोर चिपसेट उपलब्ध केला आहे. टेक्नो कंपनीचा हा नवीन मोबाईल Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करेल. हा स्मार्टफोन डायनामिक पोर्टने सुसज्ज आहे. ज्यामुळे युजर्स ला सहजरीत्या नोटिफिकेशन मिळेल.

कॅमेरा

Tecno Spark 20C या मोबाईल 50 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या प्रायमरी कॅमेरा सोबत AI लेन्स देखील मिळेल. मोबाईल मध्ये 8 MP  फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने  4 + 4  GB रॅम आणि  8+8 GB  रॅम दिली आहे. यासोबतच 128 GB इंटरनल स्टोरेज यामध्ये मिळते.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स

TECNO SPARK 20C स्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये ड्युअल स्पीकर सेटअप, कनेक्टिव्हिटी साठी ब्लूटूथ,  वाय-फाय, FM, GPS, OTG यासारखे फीचर्स मिळतील.