Tecno Spark Go 2024 : 8 GB रॅमसह Tecno ने लाँच केला जबरदस्त मोबाईल

टाइम्स मराठी । टेक्नो कंपनी भारतामध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी TECNO POP 8 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Tecno Spark Go 2024 आहे. या स्मार्टफोन सिरीजच्या माध्यमातून कंपनीने मलेशिया येथे ग्लोबली पदार्पण केले होते. TECNO POP 8 या मोबाईलच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने अजून स्मार्टफोनच्या किमतींचा खुलासा केलेला नाही. लवकरच कंपनीकडून या मोबाईल किमतींची घोषणा करण्यात येणार आहे. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने बरेच फीचर्स उपलब्ध केले असून तुम्ही हा स्मार्टफोन चार कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतात. जाणून घेऊया स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Tecno Spark Go 2024 मध्ये सेंट्रल पंचहोल नॉच सह 6.6 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.  कंपनीने या टेक्नो स्पार्क सिरीज स्मार्टफोनमध्ये डायनामिक पोर्ट डिस्प्ले चा वापर केला आहे. हा डिस्प्ले गोळीच्या आकाराचा असून POP UP मध्ये महत्त्वाची माहिती दाखवतो. एवढेच नाही तर Apple च्या डायनामिक आयलँड प्रमाणेच काम करतो. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये UniSoC T606 प्रोसेसर दिला आहे.

कॅमेरा- Tecno Spark Go 2024

Tecno Spark Go 2024 या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये प्रायमरी शूटरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. एवढेच नाही तर प्रायमरी कॅमेरा हा AI लेन्स आणि LED फ्लॅश वर बेस्ड आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 13 MP प्रायमरी कॅमेरा दिला असून सेल्फी साठी 8 MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तुम्हाला या मोबाईल मध्ये 5000MAH बॅटरी मिळत असून ही बॅटरी 10 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

स्टोरेज

Tecno Spark Go 2024 स्मार्टफोनमध्ये  4GB इनबिल्ड आणि 4 GB एक्सटेंडेड याप्रमाणे  8 GB रॅम देण्यात आली आहे. यासोबतच 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज मायक्रो SD कार्ड च्या माध्यमातून 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. कंपनीने हा स्मार्टफोन ग्रॅव्हिटी ब्लॅक, मॅजिक स्कीन, एल्पेंग्लो गोल्ड, मिस्ट्री व्हाईट या कलर सह उपलब्ध केला आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, साईड माउंटेन फिंगरप्रिंट सेंसर, 4G नेटवर्क कनेक्टिव्हिटी, ड्युअल स्टिरिओ स्पीकर, वायफाय, ब्लूटूथ, GPS, OTG, FM रेडिओ यासारखे  कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध केले आहे. याशिवाय मोबाईल मध्ये टाईप सी चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आले आहे.