Tesla Cybertruck ची डिलिव्हरी सुरु; लूक पाहूनच थक्क व्हाल

Tesla Cybertruck : Tesla कंपनीने 2021 मध्ये  Cybertruck चे अनावरण केले होते. आता कंपनीने या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरु केली आहे. त्यानुसार कंपनीने उत्तर अमेरिकेमध्ये Tesla Cybertruck ची दहा लोकांना डिलिव्हरी केली आहे. टेस्ला कंपनीची ही भविष्यातील इलेक्ट्रिक कार असेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या इलेक्ट्रिक कार साठी  दोन लाख लोकांनी बुकिंग केलं आहे. Tesla कंपनी 2026 पर्यंत भारतात  EV कार डेव्हलप करण्यास सुरुवात करेल. यासोबतच Tesla कंपनी भारतीय मार्केटमध्ये 2024 ला म्हणजेच पुढच्या वर्षी एन्ट्री करणार आहे.

   

किंमत

Tesla Cybertruck  या इलेक्ट्रिक कारची बुकिंग 835 रुपयांमध्ये करण्यात येत आहे. या कारचा बेस मॉडेलची किंमत 66 लाख रुपये एवढी असून टॉप मॉडेलची किंमत 83 लाख रुपये एवढी आहे. Tesla कंपनीची ही कार 5.87 मीटर लांब आहे.Tesla कंपनीची ही बुलेटप्रूफ फोर व्हीलर असून कंपनीने या इलेक्ट्रिक फोर व्हीलरला रेडिकल PRISMATIC बॉडीवर्क दिले आहे.

स्टीयरिंग व्हील्स

Tesla Cybertruck या इलेक्ट्रिक कार मध्ये डिझायनर स्टेनलेस स्टील अलॉय आणि बॉडी मिळेल. यासोबतच 35 इंच मोठे टायर, 17 इंच ग्राउंड क्लियरन्स मिळेल. जेणेकरून खराब  रस्त्यांवर आणि उंच पहाडांवर, बर्फाळ प्रदेशामध्ये देखील ही कार सहजरीत्या चालू शकते. यामध्ये डॅशिंग लुक्समध्ये चार व्हील्स स्टियरिंग देण्यात आले आहे.

रेंज किती? – Tesla Cybertruck

Tesla Cybertruck या इलेक्ट्रिक कार मध्ये डिजिटल डिस्प्ले आणि टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही कार 2.6 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तास एवढी स्पीड पकडण्यास सक्षम आहे. Tesla कंपनीने या कार मध्ये 1000 kwh चार्जिंग क्षमता असलेली बॅटरी उपलब्ध केली आहे. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही कार सिंगल चार्ज वर 547 किलोमीटर अंतर पार करते.