iPhone ची झोप उडवणार टेस्लाचा Mobile; लूक पाहूनच प्रेमात पडाल

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील माणसाची गरज बनली आहे. बाजारात अनेक मोबाईल निर्माता कंपन्या असून आपल्या यूजर्सना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी या सर्व कंपन्या सतत अपडेटेड व्हर्जन मध्ये नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आत्तापर्यन्त तुम्ही सॅमसंग, ओप्पो, विवो, नोकिया, आणि Iphone यांसारख्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांबद्दल माहिती असेल. परंतु इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) आता लवकरच आपला पहिलावाहिला मोबाईल बाजारात आणणार आहे. कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी या नव्या मोबाईलचा फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

   

एलन मस्क यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एलन मस्क यांनी टेस्लाच्या फोनचा फोटो शेअर करत, ‘कोणाला टेस्ला फोन वापरायचा आहे का?’ असा सवाल केला. तसेच या टेस्ला फोन मध्ये X अँप प्री इन्स्टॉल केले जाईल. असेही एलोन मस्क यांनी म्हंटल आहे. तुम्ही जर या मोबाईलचा लूक बघितला तर नक्कीच अतिशय आकर्षक असा हा मोबाईल दिसत आहे. टेस्लाचा हा स्मार्टफोन मार्केटमध्ये iphone ला जोरदार टक्कर देईल.

एलन मस्क यांनी ट्विटरवर या मोबाईल बाबत पोस्ट केल्यानंतर बऱ्याच जणांनी त्यांना प्रश्न विचारले. एका युजरने विचारलं की, टेस्ला फोन मध्ये फ्री स्पीच सर्वर सध्याच्या काळात देखील उपलब्ध आहे का? तर दुसरा युजर्स विचारतो की, टेस्ला फोन मध्ये XOS उपलब्ध आहे का? रेयान नावाच्या युजरने एलन मस्क यांना विचारलं की, या टेस्ला फोनचं वजन आणि साईज सांगू शकाल का? जर टेस्ला स्मार्टफोन आयफोन 12 मिनीच्या साईज आणि वजना एवढा असेल तर टेस्ला स्मार्टफोन नक्कीच वापरेल असं त्यांनी म्हंटल. यावर एलन मस्क यांनी उत्तर दिले की, आयफोन पेक्षाही टेस्ला फोन भारी असेल.