मगरीने भरलेल्या तळ्यातून बोट निघाली सुसाट, अंगावर काटा आणणारा Video Viral

टाइम्स मराठी | पाण्यात मगर म्हणलं की, त्या पाण्यात जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. एखाद्या माणसावर मगरीने हल्ला केला तर तो माणूस परत जिवंत येत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे मगरीशी चुकूनही कोणी जवळीक साधायला जात नाही. तसेच, इतर प्राण्यांप्रमाणे मगरीसोबत कोणीही मस्ती करण्याचा किंवा खेळण्याचा विचार करत नाही. आजवर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मगरीने केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ पाहत आलो आहोत. अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मगरीचा हल्ला किती भयानक असू शकतो हे दिसलेच असेल. त्यामुळे मगर म्हटलं की आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

   

मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तळ्यात एक किंवा दोन मगरी दिसत नाही तर संपूर्ण मगरींचा ढीगच दिसतोय. मुख्य म्हणजे अशा पाण्याच्या तळ्यातून एक माणूस चक्क बोट चालवत आहे. या तळ्यामध्ये पाणी कमी पण मगरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्याच अंगावर काटा येत आहे. सध्या या खतरनाक व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अनेकांनी या व्हिडिओला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे. या व्हिडिओ, सीसीटिव्ही इडियटस् अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की, एका लहान तळ्यातून एक बोट चालली आहे. बोट थोडे पुढे गेल्यानंतर या तळ्यामध्ये पाणी कमी पण सगळीकडे मगरीच दिसतात. या तळ्यामध्ये एका जागी संपूर्ण मगरींचा समूह जमलेला दिसत आहे. अशा मगरींमधून वाट काढत ही बोट पुढे चालली आहे. या तळ्यात एक किंवा चार-पाच मगरी दिसत नाही तर संपूर्ण मगरीचा समूहच दिसत आहे. त्यामुळे कोणताही व्यक्ती अशा तळ्यात जाण्याचे चुकूनही धाडस करणार नाही. मात्र एका व्यक्तीने हे धाडस केल्यामुळे या मगरींचा हा भयानक व्हिडिओ समोर आला आहे.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो लोकांनी शेअर केले आहे. तसेच या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. 39 सेंकदाच्या व्हिडीओने सर्वांनाच थक्क केले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील सोशल मीडियावर अनेक थरारक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या व्हायरल होणारा या मगरीचा व्हिडिओ मनात भिती निर्माण करणारा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही चुकून अशा तळ्यात जाण्याचा विचार करणार नाही.