जगातील सर्वात मोठे जहाज!! एकावेळी तब्बल इतके प्रवाशी बसतील

टाइम्स मराठी । नुकतंच फिनलॅन्ड येथील मेयर तुर्क शिपयार्ड मध्ये जगातील सर्वांत मोठा क्रुज जहाज बनवून तयार झालेला आहे. हे जहाज प्राकृतिक गॅस आणि फ्युअल सेल टेक्नॉलॉजीवर चालणारे जगातील पहिले जहाज आहे. आयकॉन ऑफ द सीज ( Icon of the Seas ) असं या जहाजाचे नाव असून हे सर्वात मोठे जहाज आहे. आयकॉन ऑफ द सीज या रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल यांनी तयार केलेल्या या जहाजाचे कन्स्ट्रक्शन नुकतच फिनलँड येथील शिपयार्ड या ठिकाणी पूर्ण झाले. हे जहाज अनेक आलिशान वैशिष्ट्यांनी सुसज्ज असं आहे. त्याचबरोबर या जहाजामध्ये अनेक सोयी सुविधा देण्यात आलेल्या असून हे जहाज पुढच्या वर्षीपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे.

   

आयकॉन ऑफ द सीज हे जहाज 365 मिटर लांब म्हणजेच 1200 फुट लांब असलेलं सर्वात मोठं जहाज आहे. या जहाजाचं वजन अंदाजे 2,50,800 टन एवढे असून सुमारे 5,610 प्रवासी आणि 2,350 क्रू मेंबर्स यात बसू शकतात. 22 जूनला या जहाजाची पहिली टेस्ट यशस्वीपणे पूर्ण झालेली असून ऑक्टोंबर मध्ये मेन टेस्ट घेण्यात येणार आहे.

कोणकोणत्या सोयीसुविधा मिळतात –

या आलिशान जहाजामध्ये सर्वांत मोठं वॉटर पार्क आहे. त्यामध्ये ६ वॉटर्स स्लाईड्स , ७ थंड पाण्याचे स्विमिंग पूल, 9 गरम पाण्याचे स्विमिंग पूल देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या वॉटर पार्क ला वेगवेगळे नाव सुद्धा देण्यात आलेली आहे. याशिवाय 40 पेक्षा जास्त रेस्टॉरंट, 28 वेगवेगळ्या राहण्याच्या सोयी, स्पा, स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण सोयी सुविधा या जहाजात देण्यात आलेल्या आहेत.

प्रवाशांसाठी या तारखेपासून सुरू होईल –

हे जहाज प्रवाशांसाठी 27 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठीच सर्वात पहिलं ठिकाण मियामी असेल. 27 जानेवारीपासून एप्रिल 2025 पर्यंत हे जहाज मियामी इथेच राहणार आहे. त्यानंतर केरेबियन साठी निघेल.

प्रवासासाठी भाडे किती असेल ?

या जहाजामध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ७ दिवसांसाठी कमीत कमी 1,007 डॉलर आणि जास्तीत जास्त 2,879 डॉलर एवढे पैसे मोजावे लागतील.