टाइम्स मराठी । 2023 या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 5G युजर्सची संख्या 13 कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच 2029 पर्यंत ही संख्या 86 कोटी पर्यंत जाऊ शकते. एरिक्सन यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2029 या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात 5G ग्राहकांची हिस्सेदारी ही 68% एवढी होऊ शकते. यामुळे देशाला डिजिटली सक्षम बनवण्याच्या सरकारच्या व्हिजनला समर्थन मिळत असल्याचे दिसून येते.
काय म्हणाले एरिक्सन इंडिया चे प्रमुख
एरिक्सन इंडियाचे प्रमुख नितीन बंसल यांनी या रिपोर्ट बाबत सांगितलं की, मोबाईल नेटवर्कने भारतात सामाजिक आणि आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामुळे देशाला डिजिटल पद्धतीने सक्षम बनवण्यासाठी सरकारच्या दृष्टिकोनाला समर्थन मिळत आहे. जेव्हा भारतात 4G सुविधा उपलब्ध करण्यात आली, तेव्हापासून देशात कनेक्टिव्हिटी आणि डेटाची वाढ बघायला मिळत आहे.
एवढी वाढेल 5G सबस्क्राईबरची संख्या
5G कनेक्टिव्हिटी भारतामध्ये ऑक्टोबर 2022 ला रोलआउट करण्यात आले होते. त्यानंतर 5G नेटवर्क मोठ्या प्रमाणात युजरच्या हाती आले आहेत. ज्या पद्धतीने 5G कनेक्टिव्हिटी कडे वळत आहे, त्यानुसार 4G युजर्स 2023 च्या अखेरपर्यंत 87 कोटी वरून 2029 च्या अखेर पर्यंत 39 कोटी एवढी राहील. आणि 2029 पर्यंत मोबाईल यूजर ची संख्या 127 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज लावण्यात येत आहे.
डेटा वापर
स्मार्टफोन डेटा वापराबद्दल बोलायचं झालं तर, 2023 मध्ये 31 GB प्रति महिन्यावरून 2029 मध्ये 75 GB प्रति महिना एवढा डेटा वापर वाढू शकतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर 5G युजर्सची संख्या वर्षाच्या अखेरीस 61 कोटी पेक्षा जास्त पोहोचण्याची शक्यता आहे.