Netflix च्या सबस्क्रीप्शन प्लॅनची किंमत वाढण्याची शक्यता; ग्राहकांना बसणार धक्का

टाइम्स मराठी । आजकाल बरेच चित्रपट हे OTT प्लॅटफॉर्मवर लॉन्च होत असतात. त्यातच प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix ने काही महिन्यांपूर्वी  पासवर्ड शेअरिंग चे ऑप्शन बंद केला होते. परंतु कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे नेटफ्लिक्सच्या सबस्क्राईबर्स ची संख्या घटली असून आता ही संख्या 6 मिलियन एवढी झाली आहे. यापूर्वी Netflix सबस्क्रीप्शन घेतलेल्या सबस्क्राईबर्सची संख्या 100 मिलियनच्या जवळपास होती. आता कंपनीकडून सबस्क्राईबर्स वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु आता नेटफ्लिक्स कडून सबस्क्राईबर्सला आणखीन एक धक्का बसू शकतो. लवकरच नेटफ्लिक्स सबस्क्रीप्शन कॉस्ट देखील वाढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

   

मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स ला Netflix या OTT प्लॅटफॉर्मची मोठ्या प्रमाणात सवय लागली आहे. त्यामुळे आता नेटफ्लिक्स गरज बनली आहे. नेटफ्लिक्स चे जगभरामध्ये लाखो करोडो युजर्स आहेत. परंतु नेटफ्लिक्स ने पासवर्ड शेअरिंग ऑप्शन बंद केल्यानंतर कंपनीचे बरेच युजर्स कमी झाले आहे. आता नेटफ्लिक्स  त्यांचे सबस्क्राईबर कसे परत आणतील हा एक प्रश्न उभा राहतो. त्यातच आता नेटफ्लिक्स ने सबस्क्रीप्शन प्लॅन किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे  आणखीन युजर्स कमी होण्याची शक्यता आहे. अशातच आता नेटफ्लिक्स कशा पद्धतीने   त्यांचे सबस्क्राईबर्स परत आणतील हे पाहणे सोईस्कर ठरेल.

नेटफ्लिक्स ने मागच्या वर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एड्स सपोर्टेड सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च केले होते. या प्लान ची किंमत 6.99 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार, 578 प्रति महिना एवढे होते. आता कंपनी लवकरच ऍड फ्री असलेल्या प्लॅन ची किंमत वाढवू शकते. जेणेकरून बेस प्लॅन कडे ग्राहक  मोठ्या प्रमाणात वळतील. यामुळे कंपनीचा युजर बेस वाढेल आणि एड्स मुळे रेवेन्यू देखील चांगला मिळेल.