Motorola edge 40 Neo अपकमिंग स्मार्टफोनची किंमत आली समोर; ‘हे’ असतील दमदार फिचर्स

TIMES MARATHI | इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोला लवकरच edge सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन 14 सप्टेंबरला लॉन्च करणार आहे. परंतु लॉन्चिंग पूर्वीच या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. 14 सप्टेंबरला लॉन्च होणाऱ्या या स्मार्टफोनचं नाव Motorola edge 40 Neo असं आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज व्हेरिएंट आणि किमत देखील उघड झाली आहे. जाणून घेऊया काय आहे याची किमती.

   

फिचर्स

Motorola edge 40 Neo या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच full HD POLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 144hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये mediatek Dimensity 1050 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबतच पावर बॅकअपसाठी 5000 mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 68 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Motorola edge 40 Neo या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफी आणि सेल्फीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, अल्ट्रा वाइड अँगल 13 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात येऊ शकतो.

किमत

Motorola edge 40 Neo हा स्मार्टफोन 14 सप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन रोमानिया या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार असून त्यानंतर इतर देशांमध्ये लॉन्च करण्यात येईल. मोटोरोला कंपनी या अपकमिंग स्मार्टफोन लॉन्चिंगला make a splash या टॅगलाईनच्या माध्यमातून प्रमोट करत आहे. त्याचबरोबर या मोबाईल ला IP68 रेटिंग उपलब्ध असू शकते. नुकतीच या अपकमिंग स्मार्टफोनची युरोपियन प्राइस लीक झाली आहे. यामध्ये Motorola edge 40 Neo च्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज या स्टोरेज व्हेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो. या लीक झालेल्या व्हेरीएंटची किंमत 338.99 युरो एवढी असल्याची शक्यता आहे. ही किंमत भारतीय करन्सीनुसार 30,200 रुपये एवढी असेल.