Chandrayaan- 3 मिशन सोबत पाठवण्यात आलेले प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीकडे परतले; ISRO ला मिळाले यश 

टाइम्स मराठी । ISRO या भारतीय अंतराळ संशोधन या संस्थेकडून 14 जुलै 2023 ला Chandrayaan- 3 हे मिशन लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर चांद्रयान तीन मोहिमेच्या लॅन्डरने चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करत यश मिळवले. हे इस्रोचे आणि भारताचे सर्वात मोठे यश होते. त्यानंतर आता इस्रो ने पृथ्वीच्या कक्षेत चंद्रभोवती फिरणारे चांद्रयान 3 यासंदर्भात केलेला एक प्रयोग यशस्वी ठरला आहे. इस्रो ने चांद्रयान 3  मिशन मधील प्रोपल्शन मोड्युल पृथ्वीच्या कक्षेत परत आणले आहे.

   

 या तारखेपासून सुरू होता प्रवास

 इस्रो कडून प्रोपल्शन मोड्युल परत पृथ्वीवर आणण्यासाठी 10 नोव्हेंबर पासून हा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर 22 नोव्हेंबरला हे मॉड्युल पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदू पर्यंत गेले. आता हे मॉड्युल पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. म्हणजेच आता इस्त्रो फक्त चंद्रावर एखादी वस्तू पाठवण्यासोबतच त्या ठिकाणावरून वस्तू परत देखील आणू शकते. हे साध्य झाले. यामुळे इस्रो ने अंतराळ संशोधनांमध्ये नवीन इतिहास रचला आहे.

 चांद्रयान 3 मिशनच्या माध्यमातून विक्रम लँडर यशस्वीरित्या लँडिंग केल्यानंतर  इस्त्रोला सर्वात मोठे यश मिळाले होते. लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानने 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर 14 दिवस कार्यरत होते. त्याचवेळी प्रोपल्शन मॉड्युल चे काम लँडर आणि मॉड्युलला पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेमध्ये वेगळे करणे हे होते. आणि हे काम आता यशस्वीपणे पार पडले आहे. इस्रो ने पाठवलेले हे प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या 150 km कक्षेत फिरत होते. आता हे मॉडेल पृथ्वीच्या कक्षेत आले आहे.

 उपग्रहाला आदळण्याचा धोका नाही

चांद्रयान तीन मोहिमेवेळी  इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेमुळे 100 किलो इंधन बचत झाली. इस्रोने प्रोपल्शन मॉड्युल परत आणण्यासाठी या इंधनाचा वापर करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. प्रोपल्शन मॉड्युल तेरा दिवसात पृथ्वी भोवती प्रदक्षिणा  पूर्ण करत आहे. त्याचबरोबर या मॉड्युलचे कक्ष देखील बदलण्यात आले असून पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कोणत्याही उपग्रहाला प्रोपल्शन मॉड्युल आदळण्याचा धोका नसल्याचे इस्रोने स्पष्ट केलं.