कबरीतून आला ओरडण्याचा आवाज, खोदून पाहताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

टाइम्स मराठी । प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या पद्धती आणि रसम असतात. जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या त्या धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अग्नी दिला जातो. त्याच प्रकारे ख्रिश्चन धर्मामध्ये मृतदेह दफन केला जातो. पारसी समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीचा मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी एका जागेवर सोडला जातो. त्याच प्रकारे एका ख्रिश्चन महिलेचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. ख्रिश्चन धर्मानुसार त्या महिलेचा मृतदेह शवपेटीमध्ये घालून दफन विधी करण्यात आला. परंतु दफन विधीच्या 11 दिवसानंतर या शवपेटीतुन आवाज येऊ लागला आणि ही शवपेटी पुन्हा उघडावी लागली.

   

काय आहे घटना

या मृत पावलेल्या महिलेचं नाव रोसांगेला अल्मेडा असं होतं. ही महिला 37 वर्षाची होती. या महिलेचा दफन विधी झाल्यानंतर 11 दिवसांनी कब्रस्तानातून काही व्यक्तींनी या महिलेच्या कबरीतून आवाज ऐकले होते. त्यानुसार त्यांनी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. हे ऐकल्या नंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. आणि शेवटी कुटुंबाने प्लास्टर तोडून शवपेटी उघडली. रोसांगेला अल्मेडा मृत अवस्थेत होती. परंतु तिला दफन करताना ती ज्या अवस्थेत होती, त्यापैकी विरुद्ध अवस्थेत शवपेटीतून काढताना दिसली. म्हणजेच तिला पुरताना ज्या पद्धतीने तिच्या नाकात कापूस टाकलेला होता. तो निघाल्याचे दिसून येत होते. तिची अवस्था पाहून तिला चुकून जिवंत पुरले गेले असल्याचं आढळून आले.

तिला बाहेर काढल्यानंतर शवपेटीत होते रक्त

रोसांगेला अल्मेडा ही मृत महिला शवपेटीमध्ये अकरा दिवसांपासून बेशुद्ध पडलेली होती. ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी तिच्या हाताला लागले असेल. यासोबतच कबरीतून तिचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शव पेटीमध्ये रक्त दिसत होते. शवपेटीतून बाहेर पडण्यासाठी रोसांगेला अल्मेडा ने प्रचंड आरडाओरडा केला असेल. त्याचबरोबर शव पेटीच्या दरवाजाला तिने जोरजोरात हाताने मारून फोडण्याचा प्रयत्न केला असेल. त्याचवेळी तिच्या हाताला गंभीर जखम झाली असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.