कासवाची अंगठी घालण्याचे आहेत अनेक लाभदायी फायदे; ‘या’ राशीतील लोकांची होईल भरभराट

TIMES MARATHI | प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने अंगुठी परिधान करणे योग्य समजते. बरेचजण करंगळीमध्ये चांदीची अंगुठी घातल्याने डोके शांत राहते असे म्हणतात. त्याचप्रकारे कासवाची अंगठी देखील मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. त्यामुळे बरेच जण फॅशन म्हणून कासवाची अंगुठी वापरतात. परंतु हे चुकीचं असून कासवाला एक परिपूर्ण स्थान आहे. यासोबतच कासवाला धन लाभ आणि सुख समृद्धीचे प्रतीक मानल्या जाते. आणि याला अपवाद म्हणजे काही नियमांचे पालन न करता ही कासवाची अंगुठी परिधान केल्यास बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, कासवाला एक वेगळेच महत्व आहे. कासवाला भगवान विष्णूच्या कच्छप अवतार मानल्या जाते. जर तुम्ही कासवाची अंगुठी परिधान करत असाल तर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये सुखद बदलाव होउन भरभराट होईल.

   

कासव हा पाण्यामध्ये राहणारा जीव आहे आणि लक्ष्मी देवीची उत्पत्ती देखील समुद्रमंथनातून झाली होती. त्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव उग्र आणि आर्थिक स्थिती खराब असेल तर अशा व्यक्तींनी कासवाची अंगठी परिधान करणे लाभदायी मानतात. परंतु काही राशींच्या व्यक्तींसाठी कासवाची अंगूठी परिधान करणे योग्य नाही. मेष कन्या वृश्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींनी ही अंगठी परिधान करणे टाळले पाहिजे. कारण काही राशींवर या अंगुठीचा आर्थिक परिणाम दिसून येतो.

रत्न शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ मकर या राशीतील व्यक्तींनी कासवाची अंगूठी परिधान करणे लाभदायी ठरू शकते. त्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतात. आणि धन धान्य संपत्ती मध्ये वाढ होऊ शकते. एवढेच नाही तर वैवाहिक जीवनआणि आत्मविश्वास देखील वाढू शकतो. कासवाची अंगूठी परिधान केल्यामुळे शांतता टिकून राहते. ज्या व्यक्तींचा व्यवहार उग्र आहे आणि व्यक्तींचे डोकं शांत राहत नाही अशा व्यक्तींनी ही अंगुठी परिधान केल्यास योग्य फळ मिळते.

जर तुम्ही कासवाची अंगठी खरेदी करत असाल तर कधीही चांदीची अंगुठी परिधान करा. आणि या चांदीच्या कासवाच्या अंगुठीवर श्री हे लिहिलेले हवे. यासोबतच जेव्हा पौर्णिमा असेल त्याच दिवशी ही अंगुठी घरी आणा. त्यानंतर तुम्हाला ती अंगुठी पुजुन परिधान करावी लागेल.

  1. दही, गंगाजल, मध, तुळशी चा पत्ता हे सर्व मिक्स करून पंचामृत तयार करा.
  2. त्यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताच्या फोटोसमोर किंवा मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा.
  3. आणि ॐ भगवते कुर्माय ह्री नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.
  4. त्यानंतर एका पात्रात ही कासवाची अंगुठी ठेवून पंचामृताने अंगुठीला स्नान घाला. त्यानंतर गंगाजल घाला.
  5. यानंतर तुम्ही कासवाची चांदीची अंगुठी परिधान करू शकतात.
  6. ही अंगुठी परिधान करताना कासवाचे मूख तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.