Hero आणि Honda कंपनीत ‘या’ कारणांमुळे झाले होते वाद; एका करारामुळे संपली भागीदारी

टाइम्स मराठी | एकेकाळी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सर्वात जास्त क्रेझ असलेली कोणती बाईक होती तर ती म्हणजेच Hero Honda ची. ह्या बाईकनी तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. हिरो होंडाची बाईक सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडणारी होती. खर म्हणजे सुरुवातीला अनेकांना असे वाटायचे की, हिरो होंडा एकच कंपनी आहे. मात्र हे सत्य नव्हते. कारण की हिरो आणि होंडा या दोन वेगवेगळ्या कंपन्या होत्या. या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन हिरो होंडा ब्रँड सुरू केला होता.

   

हिरो अँड होंडा या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन 1984 साली सामंज्यसाने एक करार करून हिरो होंडा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही कंपन्यांमध्ये एक महत्त्वाचा करार देखील झाला होता ज्याअंदर्गत या दोन्ही कंपन्यांची भागीदारी सुरू झाली होती. 2010 पर्यंत या दोन्ही कंपन्या व्यवस्थित एकत्र काम करत होत्या. मात्र 2010 नंतर या दोन्ही कंपन्यांमध्ये वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आणि त्या वेगळ्या झाल्या. या दोन्ही कंपन्या नंतर स्वातंत्र्यरित्या हिरो होंडा ब्रँडला ऑपरेट करू लागल्या.

मात्र या सगळ्यात ग्राहकांचा विश्वास जिंकून ग्राहकांच्या मनात जागा निर्माण करून या दोन्ही कंपन्या वेगळ्या का झाल्या हे कोणालाच समजले नाही. तसेच यामागील नेमकी कारणे काय होती याबाबत देखील जास्त प्रमाणात चर्चा करण्यात आली नाही. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, मात्र या दोन्ही कंपन्यांनी केलेल्या करारामुळेच त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. कंपनीच्या करारानुसार ठरले होते की, होंडा ही जपानी कंपनी इंजिनचा पुरवठा करेल तर हिरो ही भारतीय कंपनी बाईकसाठी बॉडी बनवेल. तसेच दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा न करता एकाच वेळी कोणतेही प्रॉडक्ट लॉन्च करणार नाही.

वाद होण्याची कारणे

हिरो आणि होंडामध्ये ठरलेल्या करारानुसार, कंपनी अंतर्गत वेगवेगळे ब्रँड्स बाजारात आणले गेले. यानंतर कंपनीला प्रसिद्धी मिळाल्यामुळे हिरो होंडाच्या बाईकची मागणी वाढू लागली. मागणी वाढत असली तरी हिरो होंडाला प्रॉडक्ट किमतीत कोणतेच वाढ करायची नव्हती. यामुळे कंपनी काही काळ तोट्यात देखील होती. पुढे जाऊन १९९० साली डॉलरची एक्श्चेंज प्राइस रेग्युलेट झाल्यानंतर कंपनीचे भरभराटीचे दिवस आले. या सगळ्यात दोन्ही कंपन्यांमध्ये अंतर्गत वाद होण्यास देखील सुरुवात झाली.

होंडा कंपनीने आपल्या बाईक अमेरिका आणि रशियापर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली होती. मात्र हिरो कंपनीला आपल्या बाईक्स परदेशात विकता येत नव्हत्या. हिरो कंपनी इंजिनसाठी पूर्णपणे होंडावर अवलंबून होती. त्यामुळे हिरोने त्यांचा संपूर्ण प्रॉफीट फक्त इंजिन तयार करण्यासाठी वापरला. यानंतरच हिरो आणि होंडा मध्ये वाद निर्माण झाले. दोन्ही कंपन्यांच्या लक्षात आले की एकत्र काम करणे त्यांना परवडत नाहीये. शेवटी मग अनेक वाद-विवादानंतर दोन्ही कंपन्यांनी भागीदारीतून दोन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.