IPhone यूजरसाठी Whatsapp मध्ये करण्यात येणार ‘हे’ बदल

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर 2 मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. आता व्हाट्सअपने आयफोन युजर्ससाठी नवं अपडेट आणलं आहे त्यानुसार आयफोन मधील व्हाट्सअप मध्ये बरेच बदल दिसू शकतात.

   

काय आहे हे अपडेट

Whatsapp युजरसाठी ॲपच्या इंटरफेस मध्ये बरेच बदलाव करण्याची तयारी करत आहे. त्यानुसार कंपनी व्हाट्सअप मधील काही बटन नवीन डिझाईनमध्ये लॉन्च करणार आहे. सध्या तरी हा अपडेट अँड्रॉइड यूजर्ससाठी नसून iOS बीटा टेस्टसाठी उपलब्ध आहे. व्हाट्सअपच्या या अपडेट नुसार व्हाट्सअप कंपनीकडून व्हाट्सअपच्या डेव्हलपसाठी हे अपडेट करण्यात येत आहे. याबाबत wabetainfo या वेबसाईटने माहिती दिली आहे.

Whatsapp मध्ये कंपनीकडून करण्यात येईल हे बदल

या वेबसाईटनुसार, व्हाट्सअपमध्ये वरच्या बाजूने डाव्या साईडला एक प्लस आयकॉन जोडला आहे. आणि उजव्या साईडला तीन डॉट ऑपशन दिले आहे. या तीन डॉट वर क्लिक केल्यास तुम्हाला सेटिंगमध्ये जाता येईल. हे अपडेट सध्या ios युजर्स साठी उपलब्ध असून काही काळानंतर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.

चॅनेल फिचर लाईव्ह वर काम सुरु

व्हाट्सअपने काही आठवड्यांपूर्वी चैनल फीचर लाईव्ह हे अपडेट आणले होते. या चॅनल फीचरच्या माध्यमातून इंस्टाग्राम प्रमाणे व्हाट्सअप वर देखील आवडत्या एक्ट्रेस, ऍक्टर किंवा संस्थांना फॉलो करण्याचे ऑप्शन देण्यात येणार असल्याचे सांगितलं होतं. Whatsapp आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. आता व्हाट्सअपने भारतासह 150 देशांमध्ये Whatsapp चॅनेल्स लाँच केले आहेत. सध्या या फिचरवर कंपनीकडून काम सुरू आहे.

काही काळानंतर येणार हे फिचर

Whatsapp कडून लवकरच युजरनेम फीचर देखील लॉन्च करण्यात येणार आहे. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही नंबरशिवाय Whatsapp वर चॅटिंग करू शकता. इंस्टाग्राम प्रमाणे हे फिचर देखील काम करेल. यासोबतच व्हिडिओ अवतार फीचर देखील कंपनी लॉन्च करणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ कॉलवर तुमच्या चेहऱ्याच्या ऐवजी व्हिडिओ अवतार फीचर्स चा वापर करू शकतात. म्हणजेच व्हिडिओ कॉलवर असलेल्या व्यक्तीला तुमचा चेहरा नाही तर एक ॲनिमेटेड अवतार दिसेल.