Instagram प्रमाणे Facebook वरही मिळणार हे फीचर्स

टाइम्स मराठी | आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन  असतात. Whatsapp आणि Instagram मध्ये मेटा कडून बरेच फीचर्स आणि अपडेट उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यानुसार Facebook मध्ये देखील आता वेगवेगळे फीचर्स मेटा कडून उपलब्ध करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या फीचर्सबद्दल आम्ही सांगतोय….

   

फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या इंस्टाग्राम वर फेब्रुवारीमध्ये ब्रॉडकास्ट फीचर उपलब्ध करण्यात आले होते. हे फीचर मेसेजिंग ॲप प्रमाणेच काम करते. या फीचरच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या फॉलोवर सोबत डेली अपडेट शेअर करू शकतात. हे फीचर खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्या क्रिएटर साठी महत्त्वाचे ठरेल. त्यानुसार क्रियेटर्स त्यांच्या फॉलोवर्सला टाईम लाईफ अपडेट देत राहतील.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे या ब्रॉडकास्ट चॅनल फीचर्स चा विस्तार करत आहे. हे फीचर मेटा कडून फेसबुक आणि मेसेंजर मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन फीचर च्या माध्यमातून क्रियेटर आणि सेलिब्रिटी फेसबुक पेजच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ आणि व्हॉइस नोट शेअर करू शकतील. मेटा कडून हे फीचर सुरक्षितता लक्षात ठेवून डिझाईन करण्यात आले आहे. त्यानुसार ब्रॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून जे मेसेज युजर्स किंवा क्रियेटर्स पोस्ट करतील. त्यावर कोणीही रिप्लाय करू शकत नाही.

ब्रॉडकास्ट चैनल मध्ये वनवे कम्युनिकेशन मेथड उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे फक्त चॅनल डेव्हलप करणारे युजर्स म्हणजेच एडमिन मेसेज करू शकतील. आणि फॉलोवर्स फक्त यावर रिएक्शन देऊ शकतील. यासोबतच या फीचरच्या माध्यमातून पोल देखील शेअर करण्यात येऊ शकतात. जेव्हा एडमिन ब्रॉडकास्ट चॅनल बनवले आणि पहिला मेसेज पाठवेल तेव्हा फॉलोवर्सला ब्रॉडकास्ट चॅनेल जॉईन करण्यासाठी नोटिफिकेशन पाठवण्यात येईल.