2024 पासून बदलणार ‘हे’ नियम; तुम्हाला माहिती असायलाच हवेत

टाइम्स मराठी । 2023 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस बाकी असून सर्व ठिकाणी 2024 च्या स्वागताची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. 2024 या नवीन वर्षासोबतच देशामध्ये काही नियम बदलण्यात येणार आहे. हे नियम तुम्हाला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचेल. सरकारने काही नियम 2024 सुरू होण्यापूर्वीच बदलण्यात आले आहे. परंतु हे नियम एक जानेवारीपासून अमलात आणण्यात येतील.

   

विद्यार्थ्याच्या व्हिजा प्रक्रियेमध्ये बदल

एक जानेवारी 2024  या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या व्हिसा प्रक्रियेमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आता त्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंत वर्क रूट व्हिसावर स्विच करू शकणार नाही. नेदरलँड या ठिकाणी काम करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याला त्याचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत वर्क व्हिजा साठी अर्ज करणे गरजेचे आहे. परंतु वर्क व्हिजा मंजूर होईपर्यंत तुम्हाला काम करता येणार नाही.

GST दर वाढले

1 जानेवारी  2024 पासून GST च्या दरांमध्ये देखील महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यानुसार GST चे दर नवीन वर्षापासून वाढतील. हे दर 1 जानेवारीपासून 8% वरून 9 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. म्हणजेच GST एक टक्क्यांनी वाढला असून पूर्वीपेक्षा जास्त कर आता भरावा लागेल. एक जानेवारीपासून ही वाढ लागू होणार आहे.

सिम कार्ड खरेदी नियमात बदल

नवीन वर्षापासून सिम कार्ड खरेदी करण्याचे नियम देखील बदलणार आहे. 1 जानेवारीपासून ज्या व्यक्तींना सिम कार्ड खरेदी करायची आहे,  त्यांना ओळखपत्राशिवाय सिम खरेदी करता येणार नाही. सिम कार्ड खरेदी दरासोबतच सिम कार्ड विक्रेत्यांना देखील नियम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सिम विक्रेत्यांसाठी पडताळणीचा नियम लागू करण्यात आला आहे. आता एक जानेवारीपासून कोणत्याही व्यावसायिकाला सिम कार्ड विक्री करण्यापूर्वी सरकारकडे नोंदणी करावी लागेल. आणि त्यांनी कोणाला सिम कार्ड विकले आहे, याची नोंद देखील ठेवावी लागेल. असे न केल्यास सिम कार्ड विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते.