Redmi Watch 4 मध्ये मिळणार हे खास फिचर्स

टाइम्स मराठी । चायनीज टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  XIAOMI ने 29 नोव्हेंबरला मोठ्या लॉन्च इव्हेंटची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीच्या या इव्हेंट मध्ये बरेच प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये रेडमी बुक लॅपटॉप्स, रेफ्रिजरेटर, इयरबर्ड, स्मार्टवॉच यांचा समावेश असेल. या इव्हेंट मध्ये रेडमी K70 सिरीज देखील लॉन्च होऊ शकते. येव्हडच नव्हे तर या भल्यामोठ्या इव्हेंट मध्ये Redmi Watch 4 हे स्मार्टवॉच सुद्धा लाँच होणार आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टवॉच चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्टेनलेस स्टील रोटेटिंग क्राऊन मिळणार

चिनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म  Weibo वर कंपनीने  Redmi 4 या स्मार्टवॉच बद्दल माहिती लीक झाली आहे. या Smartwatch मध्ये कंपनी ॲल्युमिनियम अलॉय फ्रेम असलेली प्रीमियम डिझाईन उपलब्ध करेल. या ऑल फ्रेम सोबतच स्टेनलेस स्टील मध्ये रोटेटिंग क्राऊन देण्यात येईल . मेटल बॉडी सह लॉन्च होणारे हे पहिले स्मार्टवॉच असेल कंपनीकडून हे स्मार्टवॉच सुरुवातीला चिनी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येईल. त्यानंतर ते भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन

Redmi 4 या नवीन स्मार्टवॉच मध्ये 1.97 इंच चा मोठा चौकोनी AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 60  hz रिफ्रेश रेट ऑफर करेल. यासोबतच डिस्प्ले 600 nits पीक ब्राईटनेस ला देखील सपोर्ट करेल. या स्मार्टवॉच मध्ये देण्यात आलेला डिस्प्ले हा जास्त उजेडात  किंवा उन्हामध्ये गेल्यावर देखील क्लियर दिसेल. Redmi 4 Watch मध्ये LTPS टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून डिस्प्ले साठी अत्यंत कमी पावर चा वापर होईल. आणि लॉंग बॅटरी लाईफ युजर्सला मिळेल.

फिचर्स

Redmi 4 Watch या स्मार्टवॉच मध्ये मेटल, लेदर, फॅब्रिक,TPU या चार प्रकारचे  रिस्टबँड्स मिळतील. या स्मार्टवॉच मध्ये युजर्स ला 200 पेक्षा जास्त वॉच फेसेस मिळणार आहे. जेणेकरून युजर्स  स्टाईलनुसार पर्सनलाईज करू शकतात. या स्मार्टवॉच मध्ये बिल्ट इन GPS सपोर्ट मिळेल.  एवढेच नाही तर 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रेकिंग  यासारखे फीचर्स देखील मिळणार आहे. हे स्मार्टवॉच  5ATM वॉटर रेसिस्टेंस ऑफर करते. म्हणजेच तुम्ही पाण्यामध्ये देखील हे घड्याळ वापरू शकता.