आता हजारो Android युजर्सला मिळणार नाही Google Chrome चे लेटेस्ट अपडेट

टाइम्स मराठी । प्रत्येक मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ब्राउझर दिसते. गुगलचे हे वेब ब्राउझर मागच्या काही दशकांपासून करोडो मोबाईल आणि डेस्कटॉप युजर साठी पहिली पसंत आहे. परंतु आता Google Chrome हे वेब ब्राउझर युजर्स ला अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये वापरता येणार नाही. कारण गुगलने नुकतच क्रोम ब्राउझरचे 119 व्हर्जन रोल आउट केले आहे. परंतु यानंतर लॉन्च करण्यात येणारे क्रोम 120 हे व्हर्जन जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये वापरता येणार नाही. याबाबत गुगलने एंटरप्राइज आणि एज्युकेशन पेजवर माहिती दिली.

   

एंटरप्राइज आणि एज्युकेशन पेजवर गुगलने क्रोम व्हर्जन बाबत माहिती देत सांगितलं की, CHROME 119 हे सर्वात फास्ट ब्राउझर आहे. एवढच नाही तर  ANDROID 7 साठी हे क्रोमचे शेवटचे अपडेट असेल. यासोबतच  ANDROID 6 मध्ये फक्त  क्रोम 107 व्हर्जन सपोर्ट उपलब्ध असेल. यानंतरचे कोणतेच व्हर्जन या जुन्या ANDROID स्मार्टफोनला मिळणार नाही. या क्रोम ब्राउझर ला सर्वात जास्त वापरले जाणारे मोबाईल ब्राउझर म्हणून ओळख मिळाली होती. CHROME 119 सोबतच CHROME 120 या वर्जन मध्ये बरेच बदल करण्यात येणार आहे.

यामुळे मिळणार नाही अँड्रॉइड युजर्स ला अपडेट

गुगलने CHROME 120 अपडेट मध्ये बरेच बदल केले आहे. यामध्ये AI बेस्ड फिचर देखील उपलब्ध होऊ शकतात. परंतु हे एआय फीचर्स  जुन्या अँड्रॉइड सिस्टीम ला सपोर्ट करत नाहीत. त्याचबरोबर नवीन क्रोम ब्राउझर मध्ये ओमनीबॉक्स आणि टूलबार सह नवीन व्हिज्युअल डिस्प्ले ऑप्शन देण्यात मिळणार आहे. जर जुन्या अँड्रॉइड डिव्हाइस ला लेटेस्ट गुगल क्रोम अपडेट मिळाले नाही तर हॅकर सोप्या पद्धतीने स्मार्टफोन किंवा लॅपटॉप हॅक करू शकतात. कारण गुगल क्रोम ब्राउझरसह नवीन अपडेट आणि सिक्युरिटी फीचर्स देखील जोडले जातात. ज्यामुळे हॅकर्स डिवाइस एक्सेस करण्या पासून रोखले जाते.

2008 मध्ये लॉन्च करण्यात आले होते क्रोम

Google Chrome हे स्टेबल व्हर्जन 2008 मध्ये रोल आउट करण्यात आले होते.  हे क्रोम ब्राउझर अँड्रॉइड युजर साठी सर्वात पहिले 2012 मध्ये उपलब्ध केले होते. त्यानंतर 2016 मध्ये अँड्रॉइड 7.0 ऑपरेटिंग सिस्टीम रिलीज करण्यात आली होती. ही ऑपरेटिंग सिस्टीम सर्वात अगोदर गुगल पिक्सल या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात आली होती.