बापरे!! हे गाणं म्हणताच होतोय मृत्यू; आत्तापर्यंत 12 जणांनी गमावला जीव

टाइम्स मराठी । कंटाळा आल्यावर किंवा बोर झाल्यावर रिलॅक्स सेशन म्हणून बरेच जण गाणे ऐकत असतात. मूड फ्रेश करण्यासाठी देखील बरेच जण गाणे ऐकून आपला मूड चांगला करतात. बऱ्याचदा महिला वर्ग गाणे गुणगुणताना देखील दिसत असतात. परंतु जगामध्ये असे एक गाणे आहे ते गुणगुणल्यास जीवावर बेतू शकते. या गाण्यामुळे आतापर्यंत बारा जणांचा जीव गेला आहे. तर जाणून घेऊया या गाण्याबद्दल आणि या बारा जणांचा मृत्यू कसा झाला याबद्दल

   

डेली स्टार ने दिलेल्या रिपोर्टनुसार, हे गाणे दक्षिण पूर्व आशिया येथील फिलिपिन्स या ठिकाणचे आहे. एखादे गाणे ऐकून किंवा गुणगुणत असताना कोणाचा मृत्यू होऊ शकतो हे विचार करण्यापलीकडे असले तरीही ही घटना घडली आहे. हे गाणं 90 च्या शतकातील होते. परंतु लोकांच्या मनात भीती बसल्यामुळे अजूनही कोणीही हे गाणे गुणगुणत नाही. हे गाणे गुणगुणणाऱ्या बारा जणांचा मृत्यू झाला आहे. हे गाणं अमेरिकेचे सिंगर फ्रँक सिंनात्रा यांनी गायले होते. या गाण्याचे नाव ‘माय वे’ असं आहे. परंतु हे गाणं फिलिपिन्स मध्ये किलिंग सॉंग म्हणून ओळखलं जाते.

माय वे हे किलिंग सॉंग जेव्हा एखाद्या कॉन्सर्ट मध्ये एखादा व्यक्ती गातो तेव्हा त्याची हत्या केली जाते. असं सांगण्यात येतं. या गाण्यामुळे आतापर्यंत बारा जणांची हत्या करण्यात आली आहे. असं असताना देखील फिलिपिन्स मध्ये या गाण्यावर बॅन करण्यात आले नाही. परंतु या गाण्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात भीती निर्माण झाली आहे. फिलिपिन्स मध्ये असलेल्या कराओके क्लब मध्ये या गाण्यावर बंदी आणली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हे गाणे लोकांमध्ये हिंसा करण्याची वृत्ती जागी करते. ज्या बारमध्ये हे गाणं गायला जात होते त्या ठिकाणी हत्यार असलेले व्यक्ती सहसा येत होते. आणि दारूचा नशा आणि हे गाणं ऐकल्यामुळे त्यांच्यामध्ये हिंसा करण्याची वृत्ती जागी होत होती. यामुळे हे गाणं ऐकल्यास किंवा गुणगुणल्यास त्या व्यक्तींचा खून करण्यात येत होता. त्यामुळे अजूनही लोकांच्या मनात या गाण्याबद्दल भीती आहे.