Thomson कंपनी भारतात बनवणार Windows 11 वर चालणारे पॉकेट फ्रेंडली Laptop

टाइम्स मराठी । भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी  बाहेरील देशांमधून येणाऱ्या काही प्रॉडक्ट्सच्या आयातीवर बंदी घातली होती. या प्रॉडक्ट मध्ये लॅपटॉप, लॅपटॉप साठी लागणारे मदरबोर्ड, कीबोर्ड यांचा समावेश होता. बाहेरील देशांमधील आयात बंद केल्यानंतर भारत सरकारने PLI ही योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून भारत सरकारने देशांतर्गत लॅपटॉप तयार करण्याची योजना आखली होती. भारत सरकारची ही योजना बऱ्याच लॅपटॉप कंपन्यांच्या पसंतीस उतरली. आता योजने अंतर्गत  फ्रेंच इलेक्ट्रॉनिक मेकर कंपनी Thomson भारतातील लॅपटॉप मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. ही कंपनी आता भारतामध्ये विंडोज 11 वर चालणारे पॉकेट फ्रेंडली लॅपटॉप डेव्हलप करणार आहे.

   

अँड्रॉइड स्मार्टफोनच्या किमतीत मिळणार लॅपटॉप

थॉमसन हा फ्रेंच ब्रँड भारतीय IT हार्डवेअर मार्केटमध्ये प्रवेश करत असून लवकरच पॉकेट फ्रेंडली एन्ट्री लेवल लॅपटॉप डेव्हलप करेल. याबाबत कंपनीचे ग्लोबल जनरल मॅनेजर पियरे क्रास्नोव्स्की यांनी सांगितलं की,  कंपनी विंडोज 11 वर चालणारे लॅपटॉप डेव्हलप करण्याची योजना बनवत आहे. हे लॅपटॉप 19,990 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध असतील.  म्हणजेच हे लॅपटॉप अँड्रॉइड स्मार्टफोनच्या किमतीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी करता येईल लॅपटॉप

नोएडा येथील सहस्त्र ग्रुपने फ्रेंच इलेक्ट्रॉनिक ब्रँड थॉमसन साठी लॅपटॉप डेव्हलप करण्याचे पहिले ऑर्डर बुक केले आहे. म्हणजेच आता थॉमसन कंपनीसाठी सहस्त्र ग्रुप  देशात लॅपटॉप निर्माण करेल. थॉमसन कंपनी डेव्हलप करणारे हे लॅपटॉप ई-कॉमर्स वेबसाईट, अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स  या वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी करता येईल. एवढेच नाही तर  हे लॅपटॉप सार्वजनिकरित्या खरेदी करण्यासाठी सरकारी ई – मार्केटप्लेस ( GEM ) पोर्टलवर  सूचीबद्ध  करण्यात येणार आहे. हे लॅपटॉप पुढच्या वर्षी म्हणजेच 2024  मध्ये खरेदी करता येऊ शकतात.

100,000 युनिट डेव्हलप करण्याचे उद्दिष्ट

कंपनीने युपी आणि बाकीच्या राज्यातील सरकारला प्राथमिक शाळेसाठी प्रूफ ऑफ कन्सेप्ट आयोजित केले आहे. त्यानुसार थॉमसन कंपनी शैक्षणिक उद्देशांना लक्षात घेता लॅपटॉपचा प्रस्ताव देणार आहे. थॉमसन कंपनी साठी लॅपटॉप डेव्हलप करणारी कंपनी सहस्त्र समूहाचे सीईओवरून मनवाणी यांनी सांगितलं की, आम्ही पहिल्या वर्षात 100,000 युनिट डेव्हलप करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत. यानंतर पुढील 6 वर्षांमध्ये 250 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवण्याची योजना देखील आखण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.