मनुष्य आणि एलियन्सची भेट ‘या’ दिवशी होणार; 2045 मधून आलेल्या टाईम ट्रॅव्हलरचा मोठा दावा

टाइम्स मराठी । भविष्यातील गोष्टींबाबत आपल्याला नेहमीच कुतूहल असत, तसेच सध्या आपण एलिअन्सबद्दल सुद्धा ऐकतोय किंवा वाचतोय… खरंच या ब्रम्हांडात एलिअन्स आहेत का? जर असतील तर अजून आपल्याला कसे दिसले नाहीत. असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. परंतु 2045 मधून परत आलोय असं सांगणाऱ्या एका टाइम ट्रॅव्हलरने एलिअन्सबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. 2045 मध्ये मानव आणि एलियन्स यांची भेट होईल असे त्याने सांगितले आहे.

   

एडम आर्कन नावाच्या स्वतःला टाईम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या व्यक्तीने 2045 मध्ये मानव आणि एलियन्स यांची भेट होईल असे सांगितले आहे. यासोबतच या व्यक्तीने काही शॉकिंग भविष्यवाणी देखील केली आहे. या व्यक्तीने केलेल्या भविष्यावाणीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडिओमध्ये या व्यक्तीने पाच वर्षापेक्षाही कमी काळात एलियन येऊ शकतात अशी माहिती दिली आहे.

डेली स्टार यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, 2028 मध्ये पृथ्वीवर एलियन्स आले होते. याबाबत पूर्वीपासूनच माहिती ज्ञात होती. 2030 मध्ये जगावर एकाच कायद्यानुसार राज्य चालेल. जगातील सर्व देश हे सुपर नेशन बनतील. असं या टाईम ट्रॅव्हल्स ने सांगितलं आहे. त्याचबरोबर या टाईम ट्रॅव्हलर म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने यासाठी लाई डिटेक्टर देखील केली. यावरून सिद्ध झाले की तो जे काही बोलत आहे ते खरं आहे. यासोबतच कॅंसीलेबल पॉडकास्ट मध्ये या व्हिडिओवर बोलत असताना होस्ट इब्राहिम अब्बास म्हणाले की, एडम आर्कन हा व्यक्ती जे काही बोलत आहे ते खोटं नाही. या व्यक्तीने स्पीडमध्ये उत्तरे दिली. इंटरव्यू घेणाऱ्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर हे एडम आर्कन हे आत्मविश्वासाने देत होते. त्यामुळे  खोटे पकडले गेले नाही.

या शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट्स करण्यात आल्या आहे. या कमेंट नुसार एका व्यक्तीने कमेंट केली की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला माहिती असेल की तो खरं बोलत आहे, तेव्हा लाई डिटेक्टर काम करते. यावर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट केली की, 2045 मध्ये एडम ऑर्गन वयस्कर वाटत आहे.