650 वर्षात पृथ्वीवर काय काय घडणार? Time Traveller ने केल्या मोठमोठ्या भविष्यवाण्या; संपूर्ण जगात खळबळ

टाइम्स मराठी । आत्तापर्यंत आपण जगभरात असे अनेकजण भविष्य सांगणारे बघितले असतील. काही जणांच्या भविष्यवाण्या खऱ्या झाल्याचेही आपण ऐकले असेल. सध्याच्या जगात काय होणार आहे हे काही भविष्य सांगणाऱ्या लोकांनी अनेक शतकांपूर्वीच सांगितलं आहे. त्याच ताज उदाहरण म्हणजे 2020 मध्ये आलेल्या कोरोना बद्दल फ्रान्सच्या नास्त्रेदमसने 465 वर्षांपूर्वीच भविष्यवाणी केली होती. असाच एक व्यक्ती आता समोर आला असून जगात तिसरं महायुद्ध कधी होणार आणि अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याच भाकीत सदर व्यक्तीने केलं आहे.

   

एनो अलारिक असं या भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो स्वतःला स्वघोषित टाइम ट्रैवलर म्हणवतो. त्याने असा दावा केला आहे की तो 2671 सालातून परत आला आहे. आजपासून ६५० वर्षात जगात काय काय होणार आहे, भविष्यात दुनिया कशी असेल, जगात कधी केव्हा काय होईल या सर्वांची माहिती आपल्याला असल्याचा दावा एनो अलारिक यांनी केला आहे.

एनोच्या म्हणण्या नुसार, 2026 मध्ये तिसरं महायुद्ध होईल आणि येव्हडच नव्हे तर संपूर्ण जगावर एलियन हल्ला होणार आहे. तसेच एनो अलारिक यांनी पृथ्वी सारख्या दुसऱ्या ग्रहाला भेटण्यापर्यंत देखील भविष्यवाणी केली. त्याचबरोबर अजून एका पोस्टमुळे तो चर्चेत आलेला आहे. त्याने रॉन डिसेंटिस हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील असं भविष्य सांगितलं आहे. आता त्याने केलेली ही भविष्यवाणी खरी ठरते की काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.