Titanic Submarine : टायटॅनिक पहायला गेलेल्या पाणबुडीचा अपघात; दाऊदसह जगातील सर्वाधिक श्रीमंत 5 व्यक्तींचा मृत्यू

Titanic Submarine | 1912 मध्ये बुडालेल्या महाकाय टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. या पाणबुडीतील सर्वच्या सर्व 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारपासून या पाणबुडीचा मुख्य जहाजाशी संपर्क तुटला होता, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर या पाणबुडीचा शोध लागला, परंतु यातील पाचही लोकांचा मृत्यू झाला आहे. यु एस कोस्ट गार्ड रियल ऍडमी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

   

18 जून रोजी ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या पाणबुडी मधून 5 श्रीमंत लोक हे टायटॅनिक जहाजाचे अवशेष बघायला गेले होते. रविवारी अटलांटिक महासागराच्या तळाशी जात असताना काही तांत्रिक अडचणीमुळे या पाणबुडीचा आणि त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. या पाणबुडीचा संपर्क तुटला त्यावेळी 4 दिवस पूरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता. या घटनेनंतर पाणबुडी चा शोध घेणे सुरू झालं. अमेरिका आणि कॅनडाने संयुक्त रित्या शोधमोहीम सुरू केली. कॅनडाच्या जहाजाच्या मानवरहीत रोबोटने टायटन पाणबुडीचा ढिगारा शोधून काढला. यामध्ये सर्व लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

मृत्यु झालेले पाचही अब्जाधीश-

टायटन पाणबुडीत मृत्यू पावलेले पाचही पर्यटक अब्जावधी होते. यामध्ये OceanGate सीईओ स्टॉकटन रश, पाकिस्तानचा उद्योजक शहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, ब्रिटनचे उद्योगपती हामिश हार्डिंग आणि पॉल हेनरी या 5 अब्जाधीश व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.