Titanic Submarine : पाणबुडी बुडण्याची भविष्यवाणी 2006 लाच करण्यात आली होती? ‘त्या’ Video ने खळबळ

Titanic Submarine | टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये जगातील सर्वाधिक व्यक्तींचा समावेश होता. या घटनेने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पाणबुडी बुडणार ही भविष्यवाणी 2006 मध्येच करण्यात तर आली नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? आणिया व्हिडिओ मध्ये काय दिसतंय हे आज आपण जाणून घेऊया…..

   

नेमकं काय आहे प्रकरण- (Titanic Submarine)

न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सतरा वर्षांपूर्वी 2006 मध्ये पाणबुडी प्रकरणी भविष्यवाणी करण्यात आली होती.अमेरिकी एनिमेटेड टीवी सीरीज द सिम्‍प्‍सन असं या सिरीयलचं नाव होतं. होमर्स पैटरनिटी कुट ही सिरीयल 2006 मध्ये टीव्ही वर प्रसारित करण्यात आली होती. या सिरीयल मधला 17 वा सीजन आणि दहाव्या एपिसोड मध्ये एका घटनेबद्दल सांगण्यात आलं आहे. यामध्ये दाखवण्यात आलेला तो छोटासा पार्ट पाणबुडी सोबत घडलेल्या घटनेची जोडला जात आहे.

या सिरीयल मधील मैसन हे त्यांच्या मुलाला म्हणजेच सिम्पसन ला पाणबुडीतून (Titanic Submarine) प्रवासासाठी घेऊन जातात. त्यापूर्वी ते एक भाषण करतात. त्यावेळी ते म्हणतात की, मी आज खूप खुश आहे, कारण मी आज माझ्या मुलासोबत खजाना शोधण्यासाठी जात आहे. त्यानंतर हे दोघं समुद्रात उतरतात आणि शोध घेत असतात. त्याचवेळी ते दोघेही एका आलिशान जहाज जवळ असलेल्या मलब्याजवळ जातात. त्यांना आनंद होतो, पण त्याच दरम्यान त्यांची पाणबुडी कशाततरी अडकून पडते आणि दुर्दैवाने ऑक्सीजन लेव्हल कमी कमी होत जातो अशी ही कहाणी आहे.

परंतु आज घडलेल्या घटनेला जोडून सोशल मीडियावर याबाबत च्या भविष्यवाणीचा दावा करण्यात येत आहे. आज घडलेल्या या घटनेमध्ये (Titanic Submarine) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक पाकिस्तानी अब्जाधीशांच्या यादीतील दाऊद आणि त्यांचा मुलगा या पाणबुडी मध्ये होते. त्यामुळे ही घटना या सिरीयल चा पार्टसोबत जोडली जात आहे.