Titanic Submarine : 4 किलोमीटर खोल समुद्रात नेमकं काय घडलं? पाणबुडीचा अपघात कसा झाला?

टाइम्स मराठी | अटलांटिक महासागरामध्ये टायटॅनिक जहाजांचे अवशेष बघण्यासाठी गेलेल्या ओशन कंपनीच्या पाणबुडीचा (Titanic Submarine) अपघात होऊन सर्वच्या सर्व पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण अब्जाधीश होते. या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र समुद्रात नेमकं काय घडलं? हा अपघात कसा झाला? याकडे आता सर्वांना कुतूहल लागलं आहे.

   

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता उत्तर अटलांटिक महासागरातून टायटॅनिक जहाजांच्या अवशेषाकडे ही पाणबुडी वळवण्यात आली होती. त्यानंतर 200 मीटर खोल गेल्यानंतर या पाणबुडीचा कमांड सेंटर सोबतचा संपर्क तुटला. तेव्हापासून या पाणबुडी चा शोध घेणे सुरू झालं.

नेमकं काय घडलं? (Titanic Submarine)

यूएस कोस्ट गार्ड रियर एडमिरल जॉन माउगर यांनी सांगितल्या नुसार, टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांजवळ या ओशन कंपनीच्या पाणबुडीचे अवशेष सापडले. हे अवशेष टायटॅनिक जहाजापासून 1600 फूट अंतरावर होते. त्याचबरोबर उत्तर अटलांटिक महासागरा पासून हे अंतर 13000 फूट खोल आहे. या अवशेषांची तपासणी केली असता, पाणबुडीवर जास्त दाब आल्याने हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अमेरिकेच्या एका नौदलाने सांगितलं की, त्यांनी रविवारी स्फोटाचा आवाज ऐकला होता, त्यानंतर त्यांनी ही घटना ऑन साईट कमांडर यांना पाठवली आणि शोध मोहीम सुरू केली.

ओशन कंपनीच्या पाणबुडीच्या (Titanic Submarine) काही उपकरणांचा समुद्रात स्पोर्ट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा स्पोर्ट 2000 मीटर खोल झाला. त्यामुळे पाणबुडीचे चाचणी कव्हर उडून गेले. त्याचबरोबर या पाणबुडीचे तुकडे 4000 मीटर खोल गेलेले आहेत. हे तुकडे जमा करणं आता शोध मोहीम करणाऱ्या पथकासाठी अत्यंत अवघड काम आहे. कारण या ठिकाणी लाईट नसून संपूर्ण चिखल भाग आहे.

या पाणबुडी मध्ये प्रवासी म्हणून ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामीश हार्डिंग, पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान हा देखील होता. सुलेमान हा 19 वर्षाचा असून शहजादा दाऊद 48 तर हामिश हार्डिंग हे 58 वर्षाचे होते. त्याचबरोबर या पाणबुडीत पायलटचा देखील मृत्यू झाला आहे. ही पाणबुडी वैमानिक वेंडी हे चालवत होते.

मॅगर यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्यांनी ही शोध मोहीम सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे संपूर्ण पाण्यात ऐकणारी उपकरणे होती. तरीही या उपकरणातून स्फोट झाल्याचं ऐकू आले नाही, तरीही आम्ही त्या ठिकाणी असलेली माहिती गोळा करत राहू. रविवारी यूएस कोस्ट गार्ड, कॅनडाचे लष्करी विमान, फ्रेंच जहाज, टेलीगाईड रोबोटने शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर या पाणबुडी सोबत सकाळी 6 वाजता संपर्क तुटला. त्याचबरोबर संपर्क तुटल्यावर देखील पाणबुडीला चार दिवसांचा ऑक्सिजन पुरवठा होत होता.