TOP 3 मोबाईल कंपन्या; Samsung आघाडीवर, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण?

टाइम्स मराठी । जगातील सर्वात मोठ्या मोबाईल मार्केटमध्ये Indian Smartphone Market ची गणना मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळे विदेशी कंपन्या त्यांचं वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन यांच्याकडून एक रिपोर्ट शेअर करण्यात येतो यामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये असलेला टॉप फाईव्ह मोबाईल ब्रँड ची शिफ्टमेंट (Shipment in millions ) शेअर मार्केट आणि इयर ओव्हर इयर ग्रोथ दाखवण्यात येते. आता या इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनने नवीन रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये 2022 च्या पहिल्या तीन महिन्यातील आणि 2023 च्या पहिल्या तीन महिन्यातील आकडे समोर आले असून ग्लोबल मार्केट मध्ये सॅमसंग कंपनीने पहिला क्रमांक पटकावला आहे.

   

इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार ग्लोबल स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंग या स्मार्टफोनने पहिलं स्थान पटकावलं आहे. हा स्मार्टफोन टॉप फाईव्ह मधील पहिला क्रमांकाचा स्मार्टफोन आहे. यावर्षी 2023 मध्ये या स्मार्टफोन ब्रँड ने 6.2 मिलियन शिपमेंट सह 20.1 % मार्केट शेअर नावावर केला आहे. 2022 मध्ये या स्मार्टफोन ब्रांड ने 7.0 मिलियन शिपमेंट सह 19% मार्केट शेअर कमवला होता.

इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर चिनी ब्रँड असलेल्या विवो आणि ओपो हे स्मार्टफोन आहे. विवो या स्मार्टफोन ब्रांड ने 5.4 मिलियन युनिट ची शिपमेंट केली असून 17.7 % एवढा मार्केट शेअर आहे. तर ओपो या स्मार्टफोन ब्रांड ने 5.4 मिलियन युनिट ची शिपमेंट केली असून 17.6% एवढा मार्केट शेअर आहे.

चिनी कंपनीचा Xiaomi या स्मार्टफोनच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. बऱ्याच वर्षापर्यंत इंडियाचा नंबर वन स्मार्टफोन ब्रांड बनला होता. परंतु यंदा 2023 मध्ये या स्मार्टफोन चा रिपोर्ट खराब आलेला आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन यांच्या रिपोर्टनुसार Xiaomi हा स्मार्टफोन चौथ्या नंबरला आहे. मागच्या वर्षी या कंपनीचा स्मार्टफोन 8.5 मिलीयन शिपमेंट सह 23.4% मार्केट शेअर नावावर केला होता. परंतु यावर्षी हा ब्रँड फक्त 5.0 मिलियन स्मार्टफोन युनिट विकू शकला. आणि मार्केट शेअर 16.4% वर थांबला आहे.