Top 5 Bikes Under 1.5 Lakh : 1.5 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘या’ 5 Sport Bikes

टाइम्स मराठी । जर तुम्ही दमदार बाईक घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटच्या बाईक उपलब्ध आहेत. भारतात तरुणाई मध्ये खास करून स्पोर्ट बाईकचे वेगळेच आकर्षण आहे. दिसायला आकर्षक लूक, दमदार मायलेज असलेली गाडी आपल्या घरी असावी असं प्रत्येकालाच वाटत. जर तुमचं बजेट 1,50,000 एवढं असेल. परंतु तुम्हाला सर्वात बेस्ट स्पोर्ट बाईक घ्यायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही भारतातील टॉप फाईव्ह स्पोर्ट बाईक (Top 5 Bikes Under 1.5 Lakh) घेऊन आलेलो आहोत. ज्याची किंमत दीड लाख रुपयांपर्यंत आहे. यासोबतच ॲडव्हान्स फीचर्सने परिपूर्ण अशा या बाईक्स आहेत. चला जाणून घेऊयात…

   
hero xpulse 200 4v left front three quarter1

1) Hero Xpulse200 4v

ही हिरो कंपनीची स्पोर्ट बाईक असून या गाडीची एक्स शोरूम किंमत 1.44 लाख रुपये आहे. या स्पोर्ट बाईक मध्ये 5 स्पीड गियर देण्यात आले असून स्पोक व्हिल टाईप मध्ये उपलब्ध आहे. Hero Xpulse या बाईकमध्ये 199.6 cc इंजिन कॅपॅसिटी आहे. हे इंजिन 18.90 bhp पावर आणि 17.35 nm पीक टॉर्क जनरेट करते. एक लिटर पेट्रोल मध्ये Hero Xpulse200 4v ही बाईक 40km पर्यंत मायलेज देते.

TVS 2 1657368204090 1657368530265

2) TVS Ronin- (Top 5 Bikes Under 1.5 Lakh)

टू व्हीलर सेगमेंट मध्ये TVS कंपनीच्या गाड्याही ग्राहकांच्या चांगल्या पसंतीला उतरतात. त्यातच TVS Ronin म्हणजे तरुणाईचे आकर्षण… दमदार इंजिन पॉवर आणि आकर्षक लूक यामुळे भारतीय बाजारपेठेत TVS Ronin ही बाईक प्रचंड प्रमाणात विक्री होत आहे. ही बाईक दोन वर्षांपूर्वी लॉंच करण्यात आली होती. TVS Ronin या बाईक मध्ये 225cc, सिंगल सिलेंडर फोर वॉल्व, 4 स्टोक इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7750 आरपीएम वर 20.1 बी एच पी पॉवर देते. यासोबतच 3750 आरपीएम वर 19.93 nm टॉर्च जनरेट करते. यामध्ये इंटिग्रेटेड स्टार्टेड जनरेटर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.49 लाख रुपये आहे.

Pulsar N250

3) Pulsar N250-

कमी बजेट मध्ये मिळणारी पण जास्त मायलेज देणारी बाईक म्हणजे बजाज कंपनीची Pulsar N250…. त्यामुळे १.५० लाखांपेक्षा कमी किमतीत (Top 5 Bikes Under 1.5 Lakh) मिळणाऱ्या गाड्यांमध्ये या बाईकचा समावेश होतो. या बाईकच्या फिचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये एलसीडी स्क्रीनवर स्पीडोमीटर, ट्रिपमीटर, फ्युल लेव्हल आणि मायलेज रीडआउट यासह गिअर पोझिशन इंडिकेटर आणि क्लॉक, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सेमी डिजिटल कन्सोल, एनालॉग पॉड टैकोमीटर, LED लाइटिंग हे फीचर्स उपलब्ध आहेत. Pulsar N250 या बाईक मध्ये 249.07 cc इंजन दिलेले असून हे इंजिन 24.5 PS पावर आणि 21.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. Pulsar N250 या बाईकच्या फ्रंट आणि रियर दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक दिलेले असून ट्यूबलेस टायर आणि सिंगल पीस हँडलबार देण्यात आले आहे. Pulsar N250 तुम्हाला 1.31 लाख असून 1.50 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.

Apache RTR 200 4V

4) Apache RTR 200 4V-

ही टीव्हीएस मोटर कंपनीची बाईक असून 1.45 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 197.75 cc इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 20.54bhp पॉवर जनरेट करते. Apache RTR 200 4V ही बाईक 42 ते 50 किलोमीटर पर मीटर पर्यंत मायलेज देते. Apache RTR 200 4V ही स्पोर्ट, अर्बन आणि रेन या तीन राइडिंग मोड्स सह येते. तसेच या बाईक मध्ये प्रीलोड-अॅडजस्टेबल शोवा फ्रंट सस्पेंशन, अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्स TVS SmartXonnect ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी फीचर्स मिळतात.

Bajaj Avenger Cruise 220

5) Bajaj Avenger Cruise 220

बजाज मोटर कंपनीची ही Avenger बाईक आहे. यामध्ये 220 cc इंजन देण्यात आलेलं असून 18.76 bhp पॉवर जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गियरबॉक्सला जोडलेलं आहे. Bajaj Avenger Cruise 220 एक लिटर पेट्रोल मध्ये बाईक 40 किलोमीटर मायलेज देते. मार्केट मध्ये बजाजच्या या स्पोर्ट या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.43 लाख रुपये आहे.