Top 5 Electric Scooter In India : देशातील 5 जबरदस्त इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि रेंज

Top 5 Electric Scooter In India : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात लाँच केल्या आहेत. इलेक्ट्रिक स्कुटरच्या विक्री मध्ये सर्व कंपन्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक स्कुटर सेगमेंट मध्ये Ola, Ather, Bajaj या कंपन्या आघाडीवर आहेत. त्यामुळे प्रत्येक कंपनी ग्राहकांना आवडेल अशी, चांगली रेंज देणारी आणि महत्त्वाची म्हणजे खिशाला परवडेल अशी गाडी लाँच करत आहे. तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील ५ जबरदस्त आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटरबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

   
Ola s1 Pro

१) Ola s1 Pro- Top 5 Electric Scooter In India

ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Ola s1 pro हे जास्त विक्री झालेलं मॉडेल आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 1.40 लाख रुपये असून यामध्ये चार किलो वॅट बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 181 किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकते. त्याचबरोबर Ola s1 pro या स्कूटरची टॉप स्पीड 116 kmph एवढी आहे. Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर 12 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.39 लाख रुपये आहे.

TVS iqube

२) TVS iqube-

ही टीव्हीएस कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर असून ही स्कूटर तीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. TVS iqube ही इलेक्ट्रिक स्कुटर १०० किलोमीटर पर्यंत रेंज देते. ही स्कूटर 80% चार्ज होण्यासाठी 4.5 तासांचा वेळ लागतो. त्याचबरोबर ही स्कूटर पूर्णपणे चार्ज झाल्यावर ऑटोमॅटिक पावर ऑफ करते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत काही महिन्यांपूर्वी वाढ झाल्याने आत्ता तुम्ही TVS iqube 1.66 लाख रुपयात खरेदी करू शकता. स्कूटरमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, रिमोट व्हेइकल इमोबिलायझेशन आणि रिमोट अनलॉकिंग, 32 लीटर अंडर सीट स्टोरेज, यूएसबी चार्जिंग पोर्ट अशी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Ather 450

३) Ather 450X-

Auther 450X ही स्कूटर एकदा चार्जिंग केल्यानंतर 146 किलोमीटर पर्यंत चालते. त्याचबरोबर 90kmph टॉप स्पीड देते. Ather 450X या स्कूटरमध्ये 6.2 kw मोटर उपलब्ध असून 3.7 kwh लिथियम आयन बॅटरी देण्यात आलेली आहे. यामध्ये 3300 w ची मोटर आहे. ती चार्ज होण्यासाठी 15 तास लागतात. आणि फास्ट चार्जर ने 5 तासात ही स्कूटर पूर्णपणे चार्ज होते. Auther 450X या स्कूटरच्या टायर ची साईज ही 12 इंच असून यामध्ये संयुक्त ब्रेकिंग सिस्टीम आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सह यात रियर डिस्क ब्रेक दिलेला आहे. त्याचबरोबर 22 लिटर अंडर सीट स्टोरेज देखील उपलब्ध आहे. या स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1.28 लाख रुपये तर 1.49 लाख रुपयांपर्यंत आहे.

Bajaj Chetak

४) Bajaj Chetak –

बजाज कंपनीने लॉन्च केलेली ही इलेक्ट्रिक स्कुटर (Top 5 Electric Scooter In India) चेतक ब्रँड ची इलेक्ट्रिक इव्ही स्कुटर आहे. या स्कुटर मध्ये 50.4 V/60.4 Ah बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये कमीत कमी 4200 वॅट ची पावरफूल मोटर उपलब्ध आहे. त्याचबरोबर या बजाज इलेक्ट्रिक स्कुटरची बॅटरी साधारणतः चार्जर ने 2.75 तासात पूर्ण होते. त्याचबरोबर एकदा चार्ज केल्यावर ही स्कुटर 90km पर्यंत चालते. या सर्व बाबी या स्कूटरला अजुन दमदार बनवतात. Bajaj Chetak EV या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.22 लाख रुपये आहे. या इव्ही चं टॉप मॉडल 1.43 लाख रुपये आहे.

Simple One

५) Simple One-

Simple one ही बेंगलुरु स्टार्टअप कंपनी असून भारतात या कंपनीने Simple one ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज झाल्यावर तब्बल 212 km रेंज देते. यामध्ये 11.39bhp इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली असून ती 72 nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5kwh बॅटरी देण्यात आलेली असून पाच तासांमध्ये 80 टक्के चार्ज होते. Simple one ही इलेक्ट्रिक स्कूटर ही आजही देशातील सर्वात जास्त रेंज देणारी (Top 5 Electric Scooter In India) इलेक्ट्रिक स्कुटर आहे.