Top 5 Safest Cars In India । आज काल कार खरेदी करत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये आपली सेफ्टी, कारचा टिकाऊपणा, क्वालिटी या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आपण काय खरेदी करतो. या कार खरेदीसाठी सर्वांचा विचार करून म्हणजेच फाइव स्टार सुरक्षा रेटिंग च्या माध्यमातूनच कोणती कार खरेदी करायची हे आपण ठरवतो. अशातच जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज फाइव स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या कार्स बद्दल माहिती देणार आहोत. या माध्यमातून तुम्हाला या कारची बेस्ट रेटिंग समजेल. आणि तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित अशी गाडी कोणती हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल.
1) महिंद्रा XUV700– Top 5 Safest Cars In India
ही भारतीय ऑटोमोबाईल निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांनी निर्मित केलेली कॉम्पॅक्ट क्रॉसओवर SUV आहे. ही कार 14 ऑगस्टला लॉन्च करण्यात आली होती. आतापर्यंत या कारची एक लाख पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली आहे. या कारणे एडल्ट ओक्यूमेंट प्रोटेक्शन मध्ये 5 स्टार आणि चाइल्ड अक्यूमेंट प्रोटेक्शन मध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन इंजन ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजन उपलब्ध आहे. या कारची किंमत 14 लाख पासून 26.18 लाख रुपयांपर्यंत आहे.
2) महिंद्रा स्कार्पियो एन (Mahindra Scorpio N)
महिंद्रा कंपनीची ही स्कार्पियो एन हे लोकप्रिय मॉडेल आहे. या कारचे नुकतेच ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट च्या माध्यमातून चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून ही कार किती सेक्युअर आहे हे पाहिले जातं. यावेळी एडल्ट ओक्यूमेंट प्रोटेक्शन मध्ये या कारला 5 स्टार देण्यात आले. यासोबतच चाईल्ड प्रोटेक्शन मध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग (Top 5 Safest Cars In India) देण्यात आले . या कारची किंमत 13.05 लाख रुपयांपासून 24.50 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून यामध्ये पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट आहेत. या कारमध्ये 1997cc आणि 2198cc इंजिन देण्यात आले असून 130.07- 200.0 पावर प्रदान करते. या दोन्ही इंजन मध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमेटिव्ह गिअरबॉक्स देण्यात आले आहे.
3) टाटा पंच (Tata Punch)
ही टाटा मोटर्सची पंच मायक्रो एसयूव्ही पंच आहे. या कारच्या सेक्युरिटी टेस्ट बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन यामध्ये पाच स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन यामध्ये चार स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. टाटा पंच मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजन वापरण्यात आलेले असून हे इंजिन 86 एचपी पॉवर आणि 113 nm पीक टॉर्क जनरेट करते. टाटाच्या या कारला 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेले आहे. या कारची किंमत 5.99 लाख रुपयांपासून 9.52 पर्यंत आहे.
4) महिंद्रा XUV300
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या XUV300 या कारमध्ये दोन इंजन ऑप्शन देण्यात आले आहे.यामध्ये सर्वात पहिला १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि १. ५ लिटर टर्बो डिझेल इंजिनचा समावेश आहे. या इंजिन मध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ए एन टी ऑप्शन देण्यात आले आहे.त्याचबरोबर या कारच्या सिक्युरिटी बद्दल बोलायचं झालं तर ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट नुसार एडल्ट ओक्यूमेंट प्रोटेक्शन यामध्ये फाईव्ह स्टार आणि चाइल्ड ओक्यूमेंट प्रोटेक्शन मध्ये चार स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आली आहे.
5) टाटा अल्ट्रोज (Tata Altroz)
या कालच्या सिक्युरिटी टेस्टमध्ये एडल्ट ओक्यूमेंट प्रोटेक्शन मध्ये पाच स्टार आणि चाइल्ड अक्यूमेंट प्रोटेक्शन मध्ये चार स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. ही हॅचबॅक कार तीन इंजन ऑप्शन मध्ये उपलब्ध असून यामध्ये यामध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल, 1.2-लीटर NA टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचा समावेश आहे.