सायकलिंग करताना आवडीचे क्षण कॅप्चर करायचेत? मग हे Top Camera ठरतील तुमच्यासाठी बेस्ट

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक जण कोणताही क्षण आपल्या कॅमेरा मध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण जपून ठेवणे तो कॅप्चर करणे यामध्ये खूप आनंद मिळतो. हे मोमेंट आपण मोबाईल किंवा कॅमेरा मध्ये कैद करून ठेवतो. आणि काही वर्षानंतर किंवा काही काळानंतर कॅप्चर केलेले हे क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय बनतात. परंतु आपण सर्वच क्षण कॅप्चर करू शकत नाही. जर एखादा व्यक्ती सायकलिंग करत असेल तर तो सायकलिंग करत असतानाचा मोमेंट कॅप्चर करू शकत नाही. कारण त्यासाठी कोणती आयडिया नसते. आणि हे मोमेंट कॅप्चर करणार तरी कोण हा देखील प्रश्न असतो. कारण सायकलिंग करत असताना एका हाताने मोबाईल पकडून फोटोज कॅप्चर करणे शक्य नसतं. परंतु आता हे शक्य होणार आहे.

   

सायकलिंग करताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना चे मोमेंट कॅप्चर करण्यासाठी बाजारपेठेमध्ये वेगवेगळे मिनी कॅमेरा उपलब्ध आहे. जर तुम्ही सायकलिंग साठी लांब प्रवास करणार असाल तर तुम्ही तुमच्या सायकलवर हा कॅमेरा लावून तो क्षण कॅप्चर करू शकतात. हे कॅमेरे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने  खरेदी करू शकतात. त्यानुसार आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेल्या काही कॅमेरांबद्दल…..

QIWA 4K ACTION CAMERA

या कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही सायकलिंग करत असताना सर्व व्हिडिओज आणि फोटोज कॅप्चर करू शकतात.  त्यासाठी सायकलिंग करत असताना हा कॅमेरा हेल्मेट वर ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्ही सायकलिंग करत असताना ज्या ठिकाणी जात आहात तो व्हिडिओ हा कॅमेरा कॅप्चर करेल. QIWA 4K हा कॅमेरा जास्त करून जे ट्रॅव्हलिंग ब्लॉग करतात त्यांच्यासाठी उपयोगी आहे. हा कॅमेरा तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 2199 मध्ये खरेदी करू शकता.

AUSEK 4K ACTION CAMERA

AUSEK 4K ACTION CAMERA हा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे. म्हणजेच तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना पावसामध्ये देखील याचा वापर करू शकतात. आणि पावसामध्ये हा कॅमेरा खराब होणार नाही. या कॅमेरा मध्ये वाईड अँगल लेन्स उपलब्ध आहे. हा कॅमेरा देखील तुम्ही सायकलिंग आणि ट्रॅव्हलिंग साठी वापरू शकता. तुम्ही सुद्धा हा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन वर तुम्हाला 25% डिस्काउंटनुसार 7499 मध्ये मिळेल.

V88R 4K 24MP ACTION CAMERA

V88R 4K 24MP ACTION CAMERA हा ट्रॅव्हलिंग साठी अप्रतिम पर्याय आहे. या कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला हवे ते आवडीचे क्षण कॅप्चर करू शकतात. या कॅमेरा मध्ये 24 मेगापिक्सल लेन्स देण्यात आली आहे. Amazon या ई-कॉमर्स साइटवरून तुम्ही हा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 27% डिस्काउंट  नुसार हा कॅमेरा 2199 मध्ये मिळेल.