Top Retro Roadster Bikes In India । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या Sport आणि Retro बाईक्स उपलब्ध आहेत. भारतात Retro Bikes ला मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. ट्रॅव्हलिंगसाठी रेट्रो बाईक्स या अप्रतिम अनुभव देत असतात. यासोबतच क्लासिक आणि दमदार लुक आणि डिझाईन मध्ये या बाईक शानदार लूक देतात. या बाईकच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर अप्रतिम परफॉर्मन्स सहआरामदायक प्रवास आपण या बाईकवर करू शकतो. त्यामुळे तरुणाईची मोठी पसंती या गाडयांना पाहायला मिळते. सध्या मार्केटमध्ये Royal Enfield Hunter, Triumph, Yazd, Harley Davidson या ब्रँडच्या टॉप रेट्रो रोडस्टर बाईक्स उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या टॉप रेट्रो बाईक्स बद्दल.
१) ROYAL ENFIELD HUNTER 350
भारतात सर्वात जास्त क्रेझ हे रॉयल एनफिल्ड हंटरचे आहे. ही बाईक ऑफिस बॉय असो किंवा कॉलेज स्टुडंट सर्वांच्या आवडीची आणि फॅशनेबल बाईक आहे. ROYAL ENFIELD HUNTER 350 ही कंपनीची मिड सेगमेंट मधील जबरदस्त बाईक आहे. या बाईकची किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये 1.50 लाख रुपये एवढी आहे. ROYAL ENFIELD HUNTER 350 या बाईकमध्ये 349.34 cc bs6-2.0 सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 27 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 20.4 ps हाय मायलेज देते. कंपनीने या बाईकमध्ये 13 लिटर फ्युल टॅंक उपलब्ध आहे.
ROYAL ENFIELD HUNTER 350 या बाईक मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ट्रिपर पॉड, यूएसबी पोर्ट, ओडोमीटर, फ्युएल गेज, 2 ट्रीप मीटर, मेंटेनन्स इंडिकेटर्स या सर्व ऑप्शनसह डिजिटल डिस्प्ले देण्यात आले आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये टेलिस्कोपी फोर्क, ड्युअल शॉक एब्जोर्बर देण्यात आले आहे. यामुळे बाईक राईड करत असताना आरामदायक प्रवास मिळतो.
२) Harley Davidson X440- Top Retro Roadster Bikes In India
Harley Davidson X440 ही अमेरिकन बाईक निर्माता डेविडसन कंपनीची बाईक आहे. ही बाईक भारतात डेव्हलप करण्यात आली असून CB350, Jawa Yezdi या ब्रँडच्या बाईक सोबत प्रतिस्पर्धा करते. कंपनीने या बाईकमध्ये डे टाईम रनिंग लाईट (DRL) चा वापर केला आहे. या लाईटवर Harley Davidson नाव टाकण्यात आलेलं आहे. रेट्रो लूक देणारी ही बाईक 440 CC क्षमता असलेली बाईक आहे. सिंगल सिलेंडर इंजिन वर चालणारी बाईक 6000rpm वर 27hp पावर आणि 4000rpm वर 38 Nm टॉर्क जनरेटर करते. या बाईकला 6 स्पीड ट्रान्समिशन म्हणजे 6 गिअरबॉक्स सोबत जोडलं गेलं असून स्टॅंडर्ड स्लीपर क्लच यात देण्यात आला आहे.
Harley Davidson X440 या बाईक मध्ये सिंगल सीट सेटअप, मोठे ग्रेब रेल, ब्लूटूथ, कनेक्टिव्हिटी, TFT डिस्प्ले, सर्क्युलर शेप मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसडी फोर्क्स, डिस्क ब्रेक, साईड स्टॅन्ड इंजन कट ऑफ फंक्शन, ड्युअल चॅनेल एबीएस, 18 इंचाचा फ्रंट आणि 17 इंचाचा मागील MRF टायर यासारख्या फिचर्सने परिपूर्ण असलेल्या या बाईकची किंमत 2.27 लाख रुपये आहे.
३) TRIUMPH SPEED 400
TRIUMPH SPEED 400 ही बाईक स्टायलिश डिझाईन (Top Retro Roadster Bikes In India) करण्यात आली आहे. यामध्ये DRDL सह गोलाकार LED हेडलॅम्प देण्यात आलाय. या बाईकमध्ये गोल्डन अपसाईड डाऊन फोर्क देखील उपलब्ध आहे. आणि 13 लिटर फ्युल टॅंक देण्यात आला आहे. या फ्युएल टॅंकवर मोठा TRIUMPH लोगो देखील आपल्याला दिसतो. TRIUMPH SPEED 400 या बाईकमध्ये एक लिक्विड कुल्ड, 398 cc सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 18000 RPM वर 40 hp पावर आणि 65000 RPM वर 37.5 nm पिक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन पूर्णपणे नवीन डेव्हलप करण्यात आले आहे. या इंजिन ला TR सिरीज नाव देण्यात आले आहे. या इंजिन सोबत सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. ही बाईक 2.8 सेकंदामध्ये 0 ते 60 किलोमीटर प्रति तास एवढी रेंज पकडते. मार्केट मध्ये या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.33 लाख रुपये आहे.
४) Honda CB300R
Honda CB300R ही नियो रेट्रो रोडस्टर बाईक आहे. या बाईकची किंमत 2.77 लाख रुपये एवढी असून ही टॉप रेट्रो बाईक पैकी एक आहे. या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, लिक्विड कुल्ड, फ्यूल इंजेक्टेड, 286.01cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 30 BHP पावर आणि 27.5 nm टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स बसवण्यात आलं आहे. Honda CB300R या बाईकमध्ये ABS सिस्टीम, गिअर इंडिकेटर, इंजन किल स्विच, अलॉय व्हील, सेल्फ स्टार्ट यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. ही बाईक 30.2 किलोमीटर प्रतिलिटर एवढे मायलेज देते. या बाईक मध्ये कंपनीने डिस्क ब्रेक दिला आहे.