फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी RBI ने जारी केले नियम; पहा कोणत्या नोटा बदलून मिळतील

टाइम्स मराठी । बऱ्याचदा मार्केटमध्ये आणि दुकानांमध्ये आपल्याला फाटलेल्या नोटा दुकानदारांकडून दिल्या जातात. या फाटलेल्या नोटा आपण घाई गडबडीमध्ये न पाहता ठेवून घेतो. परंतु नंतर नोट फाटलेली असल्याचं समजतं. त्यावेळी आपण पुन्हा ही नोट घेऊन त्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही. अशावेळी आपण या नोटांचं करायचं काय हा विचार करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मिळालेल्या किंवा तुमच्याकडे असलेल्या या फाटलेल्या नोटा तुम्ही बँकेमध्ये जमा करू शकता. कोणत्याही बँकेमध्ये या नोटा घेतल्या जातात. एखाद्या बँकेकडून या नोटा बदलून देण्यात येत नसेल तर तुम्ही कारवाई देखील करू शकतात.

   

जर तुम्ही बँकेमध्ये फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी जात असाल तर सर्वात पहिले त्या नोटेची स्थिती तुम्हाला चेक करावी लागेल. जर ती नोट अत्यंत वाईट स्थितीमध्ये असेल तर बँकेतून त्या नोटेची कमी किंमत तुम्हाला मिळेल. याबाबत नुकतंच रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने नोट बदलून मिळण्याबाबत निर्देश जारी केले आहे. जाणून घेऊया कोणत्या नोट तुम्ही बदलून घेऊ शकतात. आणि याबाबत RBI चे निर्देश नेमके काय आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडिया नुसार  तुमच्याकडे 5,10,20,50  रुपयांच्या कमी किमतीच्या नोटा फाटलेल्या असतील तर तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकतात. परंतु त्यासाठी फाटलेल्या नोटांचा कमीत कमी अर्धा हिस्सा असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे 20 रुपयांची फाटलेली अर्धी नोट (50%) असेल तर तुम्हाला बँकेकडून 20 रुपयांची नवीन नोट मिळेल. जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटांची संख्या ही 50 पेक्षा जास्त असेल, आणि किंमत 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील.

काय आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया चा नियम

रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार, तुम्ही जी फाटलेली नोट बदलू इच्छित आहात, त्या नोटेवर गांधीजीचे वॉटर मार्क, RBI गव्हर्नरची सही, सिरीयल नंबर दिसत असेल तर बँकेकडून ती नोट बदलण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. यासोबतच एखादी नोट खरी असेल  तर ती देखील बदलली जाऊ शकते. यासाठी तुमच्याकडून कोणतेच पैसे वसूल करण्यात येणार नाही. परंतु तुमच्याकडे असलेल्या नोटा वाईट पद्धतीने जळालेल्या आहेत किंवा या नोटेचे सर्वात जास्त तुकडे झाले आहेत, अशा नोटा बँकेकडून बदलल्या जात नाही. एवढेच नाही तर बँक अधिकाऱ्यांना तुम्ही नोटा मुद्दामहून फाडल्या किंवा कट केल्या असल्याचा डाऊट असेल तर नोटा बदलून मिळणार नाही.

फाटलेल्या नोटा बदलल्यानंतर मिळतील एवढे पैसे

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून फाटलेल्या नोट बदलल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळतील हे त्या नोटेवर अवलंबून आहे. समजा तुमच्याकडे 2000 रुपयाच्या नोटेचा 88 सेंटीमीटर हिस्सा असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. पण तुमच्याकडे 44 cm हिस्सा असेल तर तुम्हाला त्या नोटेचे अर्धे पैसे मिळेल. यासोबतच तुमच्याकडे 2000 रुपयांची फाटलेली नोट असेल, या नोटेचा 78 सेंटीमीटर भाग सुरक्षित असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. परंतु 39 सेंटीमीटर भाग तुमच्याकडे असेल तर  तुम्हाला नोटेचे अर्धे पैसे मिळतील.