Toyota Camry Hybrid : ही आहे Toyota ची Camry Hybrid कार; पहा काय आहेत फीचर्स

Toyota Camry Hybrid : 1982 पासून मार्केटमध्ये उपलब्ध असलेली टोयोटा कंपनीची Camry Hybrid ही कार अजूनही भारतात खरेदी केली जाते. टोयोटा या जर्मन वाहन निर्माता कंपनीने कार मध्ये उपलब्ध करण्यात येणारे V6 इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता नवीन जनरेशन Camry Hybrid कार कंपनीने सादर केली आहे. या न्यू जनरेशन कार मध्ये कंपनीने  दोन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे.  जेणेकरून मध्यम आकारातील सेडान कारची रेंज वाढवण्यास मदत होईल. ही न्यू जनरेशन कार अजून भारतात लॉन्च करण्यात आली नाही. कंपनीने या कारला नवीन लुक ऑफर केला असून यामध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहे.

   

स्पेसिफिकेशन– Toyota Camry Hybrid

NEW GEN Toyota Camry Hybrid कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर सह इंजिन देण्यात आले आहे. त्यापैकी 2.5 लिटर इन लाईन 4 सिलेंडर इंजिन हे आहे. हे इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह सह  222 BHP आणि ऑल व्हील ड्राईव्ह सह 229 BHP पावर जनरेट करते.  या कारमध्ये स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच फ्रंट आणि रियर पार्किंग देखील देण्यात आली आहे.

सेफ्टी फीचर्स

NEW GEN Toyota Camry Hybrid या कारमध्ये  कंपनीने बरेच अप्रतिम  फीचर्स दिले आहेत. यामध्ये देण्यात आलेल्या सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, फ्रंट क्रॉस ट्राफिक अलर्ट, लेन चेंज असिस्ट,पॅनोरमिक  व्यू मॉनिटर, स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टीम, पार्किंग सेन्सर  देण्यात आले आहे. या कारच्या केबिनमध्ये 9 स्पीकर जेबीएल ऑडिओ सिस्टीम मिळते. NEW GEN TOYOTA CAMRY HYBRID या कारमध्ये मोठी फ्रंट ग्रील आणि LED डेटाईम रनिंग लाईट, स्लिम LED हेडलॅम्प,  टेल लाईट देखील देण्यात आली आहे.

फिचर्स

या कारमध्ये 7.0 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8.0 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, टॉप ट्रीम्स मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम साठी 12.3 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या इन्फोटेनमेंट सिस्टीम मध्ये वायरलेस चार्जिंग पॅड, वायरलेस एप्पल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यासोबतच टॉप अँड ट्रिम मध्ये 10.0 इंच हेड-अप डिस्प्ले देखील मिळतो.

कलर ऑप्शन

ही न्यू जनरेशन कार TNGA-K आर्किटेक्चर वर बेस्ड आहे. म्हणजेच ही कार 8 व्या जनरेशनच्या मॉडेलवर बेस्ड आहे. या न्यू जनरेशन कार मध्ये आइस कॅप, विंड चिल पर्ल, सेलेस्ट्रियल सिल्वर मेटॉलिक, अंडरग्राउंड, मिड नाईट ब्लॅक मेटॅलिक, सुपर सोनिक रेड, रिजवायर ब्ल्यू, ओशन जेम आणि हेवी मेटल यासारखे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.